बुलढाणा न्यूज

शेतकर्‍याने फिरविले तब्बल दहा एकरातील हरभरा पिकावर रोटावेटर

The farmer rotated the rotavator on the gram crop of as many as ten acres

          बुलडाणा न्यूज – बुलढाणा तालुक्यातील चिखला येथील रहिवाशी शेतकरी शाहीर हरिदास खांडेभराड यांनी अस्मानीसह सुलतानी संकटांना शेतकरी जिल्हयातील शेतकरी  हताश होताना दिसून येत आहे, अशातच खरीप पिक हातातून निघून गेल्यानंतर आता अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकावर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे, या सर्व बाबींला कंटाळून दहा एकरातील हरभरा पिकात रोटावेटर घालून पीक उध्वस्त केले आहे.

            चिखला येथील शेतकरी शाहीर हरिदास खांडेभराड यांच्याकडे एकूण चौदा  एकर शेतजमीन आहे, यामध्ये त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र उत्पन्नात मोठया प्रमाणात  घट आल्याने त्यांचा खर्च देखील निघाला नाही, त्यामुळे त्यांनी रब्बी पिकांवर मोठी आशा ठेवत आपल्या दहा एकर शेत जमीनत  हरभरा पिकाची पेरणी केली होती.

          याकरीता त्यांनी थोडे थोडके नव्हेतर तब्बल पावणे दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशी दह्या रोग, अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे उभे हरभरा पीक जळत आहे, त्यामुळे या शेतकर्‍याने आपल्या छातीवर दगड ठेवून  संपूर्ण दहा एकरातील हरभरा पिकात रोटावेटर घालून पीक उध्वस्त केले आहे.  हरिदास खांडेभराड यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे 3.50 लाख रुपये कर्ज असून   खाजगी पतसंस्थेचे देखील त्यांच्यावर 2 लाख रुपयांचे कर्ज आहे.  त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे द्यायचे या विवंचनेत  शेतकरी पडला.

हिस्सेवाटीचे प्रकरण मंजुरीसाठी 30 हजाराची लाच, तलाठी लागला एसीबीच्या गळाला

Leave a Comment

और पढ़ें