बुलढाणा न्यूज

माळेगांव रोडवरील खून प्रकरणाचा यशस्वी उकल

तीन आरोपी अटक तर एक चारचाकी वाहन जप्त

बुलढाणा न्यूज – नांदुरा तालुक्यातील लोणवडी येथील संदिप अर्जुन तायडे (वय 38) यांनी नांदूरा पोलीस स्टेशनला दि.3 मार्च 2024 रोजी तक्रार दिली की, त्यांचे माळेगांव रोडवरील शेतातील धुर्‍यावर एक 30 ते 35 वर्षे वयाचा अनोळखी पुरुष जातीच्या ईसमाचे प्रेत मार लागलेल्या अवस्थेत पडलेले असून, मृतकाच्या कपाळ फुटलेले, डोक्याचे डावे बाजूची चामडी निघालेली, गळ्या भोवती काळसर व्रण असल्याचे दिसत आहे. यावरुन सदर मृतकाचा कुणीतरी अज्ञात आरोपीतांनी खून केला आहे या तक्रारीवरुन नांदूरा पोलीसांनी गुन्हा नोंद करुन तपास केला असता मृतक हा हर्षल ऊर्फ पप्पु सदाशिव घोपे (वय 32) रा. घाटपुरी खामगांव ह.मु. शेगांव येथील असल्याचे समजले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला असता आकाश ऊर्फ आदिनाथ आनंदा रावणकर (वय 28) रा. घाटपूरी ता. खामगांव, रुपेश देविदास कुरवाडे (वय 28) रा.शिवनेरी चौक, शेगांव, मयुर विजय शेलार (वय 24) रा.साईनगर, वाडी ता. खामगांव या आरोपींना पकडण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले टाटा इंडीका वाहन किंमत एक लाख रुपये जप्त करण्यात आली.

गुन्ह्याचा तपास, आरोपी शोधकामी मार्गदर्शन :
सदर गंभीर, संवेदनशील आणि दखलपात्र गुन्ह्याची दखल घेवून, गुन्ह्याची यशस्वी उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करण्यासाठी श्री.सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, बुलढाणा, श्री.अशोक थोरात अपोअ. खामगांव, श्री.बी.बी.महामुनी अपोअ. बुलढाणा यांनी मार्गदर्शनात गुन्ह्याचे स्वरुप पाहून, गुन्ह्याचे उकल आणि आरोपी शोधासाठी पोलीस निरिक्षक श्री.अशोक एन.लांडे प्रभारी अधिकारी, स्था.गु.शा. बुलढाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करुन, त्यांना आरोपी शोध आणि गुन्ह्याचे उकल संबंधाने सुचित केले. पोनि अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था. गु. शा. बुलढाणा यांचे नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकांनी यशस्वी कारवाई करुन दि.7 मार्च 2024 रोजी सदर गुन्ह्याची उकल केली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी व कामगिरी पथक
ही कामगिरी सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोलीस निरिक्षक अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. बुलढाणा, पोलीस निरिक्षक विलास पाटील पो.स्टे. नांदूरा सहाय्यक पोलीस निरिक्षक आशिष चेचरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कानडे, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, पंकज मेहेर, पोना. गणेश पाटील, पोकॉ. विजय सोनोने, दिपक वायाळ, चापोना. सुरेश भिसे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पोहेकॉ. मिलींद जवंजाळ, पोना. संजय जाधव, राहूल ससाने, शैलेश बहादुरकर पोकॉ. विनायक मानकर, विनोद भोजने, कैलास सुरडकर, रवि झगरे, रवि सावळे पो.स्टे. नांदुरा, पोकॉ. संदिप टाकसाळ पो.स्टे. शिवाजीनगर, पोकॉ. प्रकाश गव्हांदे पो.स्टे. शेगांव शहर, पोहेकॉ. राजू आडवे-सायबर पो.स्टे., बुलढाणा यांचे पथकाने पार पाडली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें