बुलढाणा न्यूज

सैलानी येथील प्रसिद्ध असलेले नारळाची होळी पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारी ठरावी

जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची अपेक्षा

         बुलढाणा न्यूज : बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील प्रसिद्ध असलेले नारळाची होळी रविवार, दि. 24 मार्च 2024 रोजी होणार आहे. यात मोठ्या प्रमाणावर नारळाचा उपयोग करून होळी पेटविण्यात येते. ही होळी पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारी ठरावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येतात. या नारळाच्या होळीपासूनच येथील यात्रेला खर्‍या अर्थाने सुरुवात होते. या ठिकाणी असलेल्या दर्ग्याच्या ट्रस्टमार्फत खुल्या जागेवर होळी पेटवली जाते. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रसंग होऊ नये, यासाठी परिसराची पाहणी करून योग्य सूचना देण्यात आल्या आहे. होळी हा सण एक प्रमुख उत्सवापैकी एक आहे. हा सण पर्यावरण पूरकतेचा संदेश देणारा ठरावा.

        सैलानी बाबाच्या यात्रेला येणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्यांना योग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे उपायोजना करण्यात आली आहे. दरम्यान या भागाची पाहणी केल्यानंतर भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी ट्रस्टकडून 15, तर प्रशासनातर्फे दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी येणार्‍या भाविकांच्या संख्येनुसार या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येईल.


        यात्रेसाठी प्रशासनाने पूर्ण नियोजन केले आहे. गर्दीवरील नियंत्रणासाठी पोलीस चौकी, ट्रस्ट आणि प्रशासनातर्फे दर्गा आणि संदलच्या मार्गावर सीसीटीव्ही, तसेच सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणतीही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य पथकाची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

        सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये अनेक भाविक या ठिकाणी यात्रेदरम्यान भेटी देतात. नागरिकांनी या ठिकाणी श्रद्धा बाळगावी, तसेच अनिष्ट चालीरीती आणि परंपरांना बंद करीत चांगल्या प्रकारचे सौदार्हपूर्ण वातावरण ठेवावे. तसेच या ठिकाणी येणारे लहान मुले, महिला, वृद्ध यांची काळजी योग्य प्रकारे घ्यावी, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें