बुलढाणा न्यूज

हिस्सेवाटीचे प्रकरण मंजुरीसाठी 30 हजाराची लाच, तलाठी लागला एसीबीच्या गळाला

लाचेची मागणी केल्यास यांच्याकडे करा तक्रार

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

लाच लुचपत प्रतिबंधक, अमरावती, अमरावती पोलीस उप अधीक्षक
 दुरध्वनी क्रं –  0721-2552355
टोल फ्रि क्रं 1064

 

          बुलढाणा न्यूज – एखादा तरी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेतांना एसीबीच्या सापळ्यात अडकत असतो. अशीच काहीशी कारवाई आज शुक्रवार, दि.1 डिसेंबर रोजी अमरावती एसीबीच्या पथकाने केली. या कारवाईत 30 हजार रुपयाची लाच स्वीकारणार्‍या मोताळा येथील तलाठ्याला एसीबीच्या  पथकाने साझा कार्यालय मोताळा येथे रंगेहात अटक केली आहे. शेतजमिनीच्या हिस्सेवाटीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी आरोपी तलाठ्याने ही लाच स्वीकारली आहे. किशोर शांताराम कर्‍हाळे , मोताळा असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

         प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराचे शेतीजमिनीच्या हिस्सेवाटी प्रकरणा बाबत रीतसर अर्ज  मोताळा येथील तहसील कार्यालयात तलाठी किशोर शांताराम कर्‍हाळे यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु हे प्रकरण मंजूर करण्यासाठी तलाठी किशोर शांताराम कर्‍हाळे याने 30 हजार रुपयाची संबंधिताकडे मागणी केली होती. याबाबत संबंधितांनी सर्व प्रकार  एसीबीकडे सांगितला. या तक्रारीवरुन शुक्रवार, दि.1 डिसेंबर 2023 रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचून तलाठी किशोर कर्‍हाळे याला 30 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.

          ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक
मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रवीण बोरकुटे, युवराज राठोड, विनोद कुमार धुळे, स्वप्निल क्षीरसागर, राहुल वंजारी या पथकाने केली. आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.

अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटुंबाला राज्य सरकारने एक कोटी रुपयांची मदत द्यावी: विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार

Buldhana Today News – देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे आरोपी पुणे, अकोला, बुलढाणा जिल्हयातील

Leave a Comment

और पढ़ें