बुलढाणा न्यूज

Buldhana Today News – देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे आरोपी पुणे, अकोला, बुलढाणा जिल्हयातील

देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे टोळके, स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

एक पिस्टल, जिवंत राऊंड, दुचाकी व चारचाकी वाहनांसह 14 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Accused who buy and sell country cuttaya are from Pune, Akola, Buldhana district

स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

         

          बुलढाणा न्यूज – मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही ईसम देशी कट्टयांची खरेदी विक्री करणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक थोरात खामगांव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. देवराम गवळी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे आदेश व नेतृत्वामध्ये श्री.अशोक लांडे यांनी शुक्रवार, दि.24 नोव्हेंबर 2023 रोजी जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील गोराळा धरणाचे जवळ यातील खाली 4 आरोपी यांना देशी कट्ट्यांची ( पिस्टल) खरेदी-विक्री व्यवहार चालु असतांना छापा टाकून पकडण्यात आले. तर घटनास्थळावरुन ईतर 4 आरोपी फरारी झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे –

 

1. मोहम्मद अख्तर शेख मुश्ताक वय 31 वर्ष रा.वाशिम बायपास, अंबिकानगर, अकोला.

2. फहद खान फारुख खान वय 27 वर्ष रा.744/76 भवानी पेठ, पुणे

3. तौसिफ करीमखान वय 34 वर्ष रा.312 रविवार पेठ, शंका ज्वेलर्सजवळ, पुणे

4.रामसिंग भवानसिंग मुझाल्दा वय 26 वर्ष रा.निमखेडी ता.जळगाव जामोद जि. बुलढाणा

हे चार फरार आरोपी ताब्यात घेतले असून चार आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

 

या आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल असा

1. एक पिस्टल अंदाजे किंमत 30 हजार रुपये

2. सात नग जिवंत काडतूस (राऊंड) अंदाजे किंमत 3 हजार 500 रुपये

3. एक ईन्वोव्हा कार MH 02-Y -8213 अंदाजे किंमत 12 लाख रुपये

4. एक हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटार सायकल अंदाजे किंमत 15 हजार रुपये

5. एक पल्सर मोटार सायकल अंदाजे किंमत 1 लाख रुपये

6. सहा नग मोबाईल फोन अंदाजे किंमत 55 हजार रुपये

पिस्टल, राऊंड, इनोव्हा कार, मोटार सायकल व मोबाईल असा एकूण 14 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

आरोपींनी असा केला गुन्हा

अकोला येथील एका आरोपीच्या मध्यस्थीने पुणे येथील दोन आरोपी जळगांव जामोद येथे देशी कट्टा विकत घेण्यासाठी आले. बुलढाणा जिल्हयातील जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील गोडाळा डॅम येथे यातील आरोपीतांचा देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल) खरेदी-विक्रीचा व्यवहार चालु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन त्यांना पकडले.

यांनी केली यशस्वी कारवाई

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सुनिल कडासने बुलडाणा, अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक थोरात खामगांव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.देवराम गवळी मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखाचे श्री.अशोक एन.लांडे बुलढाणा यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक श्री.विलासकुमार सानप, पोलीस अंमलदार दिपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरूषोत्तम आघाव, गजानन गोरले, चालक पोकॉ.विलास भोसले, सायबर पोलीस स्टेशनचे राजु आडवे यांनी केली.

बुलढाणा जिल्ह्यातील 73 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती तुमच्या गावाचा समावेश आहे का पहा?

तुमची तक्रार घेत नाही माझी ड्युटी संपली, स्टेशन डायरी अंमलदार निलंबित Not taking your complaint my duty is over, station diary officer suspended

Leave a Comment

और पढ़ें