बुलढाणा न्यूज

अरे बापरे नातेवाईकांनी मृतदेह ठेवला शहर पोलीस स्टेशनला

The relatives kept the dead body at the city police station

मग झाली पोलीसांची आरोपी शोधण्यासाठी धावाधाव

            बुलढाणा न्यूज – बुलडाणा ते देऊळघाट या मार्गावर दुचाकी चालकास ऑटो रिक्षाने जोरदार धडक दिली होती. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता.यावेळी त्यास संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु दरम्यान आज बुधवार, दि.22 नोव्हेंबर 2023 रोजी त्याचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत असलेला ऑटो चालक अद्याप पोलीसांनी ताब्यात न घेतल्यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेहासह रुग्णवाहिका चक्क पोलीस स्टेशनला आणली. या प्रकारामुळे पोलीसही आचंबित झाले. यानंतर संतप्त नातेवाईकांनी जो पर्यंत ऑटो रिक्षा चालक आरोपीस पोलीस अटक करीत नाही तो पर्यंत मृतदेह घेवून न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहर पोलीसांनी या सर्व प्रकारामुळे आरोपीला शोधण्यासाठी पोलीसांची चांगलीच धावाधाव झाली होती.


        याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुलडाणा ते देऊळघाट रस्त्या नजिक दुचाकी चालक जाबिर बशीर पटेल वय 33 रा.देऊळघाट हे ऑटो रिक्षाच्या जबर धडकेत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारार्थ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्याच्यावर तेथे उपचार सुरु होते. परंतु त्याची वैद्यकीय उपचाराला त्याची प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे त्यांचा बुधवार, दि.22 नोव्हेंबर 2023 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याची वार्ता देऊळघाट येथे समजली.

           यानंतर मृतक जाबिर बशीर पटेल यांचे संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह रुग्णवाहिका बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला आणली. जोपर्यंत आरोपी ऑटो चालकास पोलीस अटक करत नाही तोपर्यंत येथून मृतदेह नेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. यामुळे बुलढाणा पोलीसांची आरोपीच्या शोधात चांगलीच दमछाक झाली होती. अखेर पोलिसांनी तपास चक्रे जोरदार फिरवित आरोपी ऑटो रिक्षा चालकास ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कारसाठी देऊळघाटकडे मार्गस्थ झाले. या सर्व प्रकारामुळे बुलढाणा पोलिसांची आरोपीस अटक केल्यानंतर सुटकेचा श्वास सोडला.

लग्नाचे आमिष देत विवाहितेवर वारंवार अत्याचार

Leave a Comment

और पढ़ें