बुलढाणा न्यूज

लग्नाचे आमिष देत विवाहितेवर वारंवार अत्याचार

लग्नाचे आमिष देत विवाहितेवर वारंवार अत्याचार Repeated abuse of the married woman with the lure of marriage

         बुलढाणा न्यूज – संग्रामपूर तालुक्यामधील टूनकी येथील माहेरी आलेल्या चोवीस वर्षीय विवाहितेवर लग्नाचे आमीष दाखवून वारंवार अत्याचार केला. तसेच तिला लग्नाचे आमिष देवून तुझ्या पतीस फारकती देत नंतर मी तुझ्याशी लग्न करतो म्हणून दबाव आणला. चोवीस वर्षी विवाहितेच्या या तक्रारीवरुन सोनाळा पोलीसांनी आरोपी विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

          याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोवीस वर्षी महिलेचे लग्न अकोट येथे दि.26 डिसेंबर 2019 रोजी पार पडले होते. ही महिला तिच्या आई सोबत टुनकी गावातील शेतमजूरीचे काम करीत होती. याच दरम्यान सदर युवक वारंवार तिच्या घरी टूनकी येथे मजूर नेण्यासाठी येत होता. त्यांच्या जवळून मजूर स्वतःच्या शेतीमध्ये बावनबीर येथे नेत असताना मुलीसोबत प्रेमाचे संबंध प्रस्थापीत केले. प्रेमाचे संबंध प्रस्थापीत केल्यानंतर महिलेस आमिष दाखविले की, मला माझ्या पत्नीपासून मुलं बाळ होत नसून मी तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणून बळजबरीने अत्याचार करू लागला. तसेच तू सुद्धा तुझ्या नवर्‍याला फारकती देऊन टाक असे म्हटल्यामुळे महिला टुनकी येथे राहू लागली. यानंतर लग्नाच्या आमिषापाई दि.20 ऑक्टोंबर 2023 रोजी फैजानोदिन नसीमुद्दीन यांच्या सांगण्यावरुन तिच्या पतीस तीने फारकती द्यावयास लावली.

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदिप बांगर यांची नियुक्ती

यानंतर बावनबीर येथे डॉ.कबीर यांच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी महिला गेली असता तिथे फैजानोदिन नसीमुद्दीन भेटला व त्याने पीडित महिलेला सोबत घेऊन तिच्या घरी टूनकी येथे सोडले. त्यावेळीस पीडित महिलेने स्वतःहून त्याला सांगितले की, तुझ्यामुळे मी माझ्या संसाराची राख रांगोळी केली आहे तू माझ्यासोबत लग्न कधी करणार यावेळी फैजानुद्दी याने लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने आईसोबत सोनाळा पोलीस स्टेशन गाठत फैजानोदिन नसीमुद्दीन यांचे विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरुन आरोपी फैजानोदिन नसीमुद्दीन याचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील हे स्वतः करीत आहेत.

सोयंदेव येथे मनोज जरांगे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Comment

और पढ़ें