बुलढाणा न्यूज

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदिप बांगर यांची नियुक्ती

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रदिप बांगर यांची नियुक्ती

Appointment of Pradip Bangar as Regional Vice President of BJP Bhatke Vimukt Aghadi


लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्याचा खर्‍या अर्थाने सन्मान झाल्याची प्रदिप बांगर यांची प्रतिक्रिया

          बीड – भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या तालमीत तयार झालेल्या प्रदिप बांगर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

            लोकनेत्या पंकजाताई मुंडे व लोकप्रिय खासदार प्रितमताई मुंडे यांच्यामुळे आज हा सोनेरी दिवस बघायला मिळाल्याची भावना प्रदिप बांगर यांनी व्यक्त केली. या नियुक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मुंडे साहेबांच्या बोटाला धरुन राजकारणाचा श्रीगणेशा करणार्‍या कार्यकर्त्याला आज भारतीय जनता पार्टीने न्याय दिल्याची भावना जनसामान्यातुन व्यक्त होताना दिसत आहे.

सोयंदेव येथे मनोज जरांगे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 

                लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रितमताई मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रभर परिचित असणारे प्रदिप बांगर यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने या तरुण तडफदार नेतृत्वाला महाराष्ट्र भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी देऊन आजपर्यंत पक्षासाठी व मुंडे घराण्यासाठी केलेल्या कामाची पोहच पावती दिली आहे. या आगोदर ते भाजपा विद्यार्थी आघाडीचे प्रदेश संघटक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सदैव अग्रेसर राहून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर काम केलेले आहे.

       प्रदिप बांगर यांना नियुक्ती पत्र रविवारी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगीर, नवनाथ आण्णा शिराळे, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.पी.टी. चव्हाण, युवा नेते सुनील मिसाळ, डॉ. लक्ष्मण जाधव, भूषण पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

प्रदिपजी बांगर यांच्या निवडी बद्दल त्यांचे पंकजाताइ मुंडे, खा.प्रितमताई मुंडे, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, आ.नमिताताई मुंदडा, आ.श्रीकांत भारतीय, आ.अभिमन्यु पवार, आ.राम सातपुते, आ.राणा जगजितसिंह पाटील, आ.सुरेश अण्णा धस, आ.लक्ष्मण पवार, सर्जेराव तात्या तांदळे, निळकंठ चाटे या सर्वांनी कौतुक केले.

Leave a Comment

और पढ़ें