बुलढाणा न्यूज

सोयंदेव येथे मनोज जरांगे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सोयंदेव येथे मनोज जरांगे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

A case has been registered against 9 accused for burning the symbolic statue of Manoj Jarange at Soyandev

          बुलढाणा न्यूज – बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव येथे सोमवार, दि.20 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी मनोज जरांगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणा दिल्या. त्यामुळे या आरोपीविरुद्ध किनगांवराजा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  मनोज-जरांगे-याच्या-प्रतिकात्मक-पुतळ्याचे-दहन.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव येथे सकाळी गावातील सज्जन गणेश शेळके, सोपान नामदेव खरात, अरुण जगन खरात, संदीप जनार्दन खरात, गणेश आसाराम नागरे व गावातील इतर तीन ते चार व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन जाळून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी याचे आदेश उल्लघन केले आहे, अशी फिर्याद पोलीस कॉस्टेंबल अब्दुल रहमान परशुवाले याच्या लेखी रिपोर्ट वरुन किनगाव राजा पोलीसांनी अप नं 270/2023 कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तिन ते चार आरोपींना अटक केली आहे.

        पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या मार्गदर्शनात किनगांवराजाचे पोहेकॉ रमेश गोरे हे करीत आहे.

Leave a Comment

और पढ़ें