हूरगड : नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या पावन निमित्ताने देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे जाऊन कुलदेवता रेणुकामातेचे संघर्षकन्या ना.पंकजा मुंडे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सोबत बहीण आमदार श्वेताताई महाले आणि अॅड.यशश्री गोपीनाथराव मुंडे उपस्थित होत्या.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूरगड येथे भक्तिमय वातावरणात रेणुकामातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताचा स्वीकार केला.
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात रेणुकामातेच्या दर्शनाने मनाला समाधान आणि नवी ऊर्जा मिळाल्याची भावना ना.पंकजा मुंडे, आमदार श्वेताताई महाले त्यांनी व्यक्त केली. यावेळी चिखली तालुक्यातील बळी आमदार काळे यांची देखील उपस्थिती होती.


बुलढाणा जिल्हा परिषदेत लाचखोरीचा आरोप; दोन वरिष्ठ सहाय्यकांना अटक






