प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व इंद्रजित पाटील यांना संत नामदेव पुरस्कार जाहीर

SHARE:

 

हिंगाेली- साहित्यिक इंद्रजित पाटील यांना संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार – २०२६,हिंगाेली जाहीर झाला. त्यांच्या बहुचर्चित शेलक्या बारा या कथासंग्रहाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा महाराष्ट्रातील मानाचा पुरस्कार असून सदर कथासंग्रहास मिळालेला हा पंधरावा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आहे.समृद्धी पब्लिकेशनचे सर्वेसर्वा व अध्यक्ष डॉ.प्रा.श्रीराम कराळे,श्री.शिवाजी महाविद्यालय,हिंगाेली मराठी विभाग प्रमुख यांनी या पुरस्काराची अधिकृतपणे घाेषणा केली.साहित्यिक इंद्रजित पाटील हे माैजे रूई,ता.बार्शी येथील एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व असून आपल्या दर्जेदार लेखणीच्या जाेरावर त्यांनी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय साहित्य पुरस्कार मिळवले आहेत.ग्रामीण भागातील विविधांगी लेखन करणाऱ्या या अवलियाचे सर्वत्र कौतुक हाेत असून अभिनंदन व हार्दीक शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment