नवरात्रीच्या उपवासामुळे फळांना वाढली मागणी

SHARE:

बुलढाणा / प्रतिनिधी

नवरात्रीतील उपवासामुळे बाजारपेठेत फळांच्या मागणीत वाढ झालेली आहे. शहराच्या विविध भागात सवर्त्र स्थानिक फळासं ह डॅ्रगन फु्रट, किवी आदी विविध फळांच्या गाड्या दिसून येत आहेत. मागणी वाढल्याने फळांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात अनेकजण उपवास करत असल्याने शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आपल्या मातीत पिकवलेली व स्थानिक फळांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेली व हंगामात न येणारी फळे खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. शहरात किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलोपर्यंचागंल्या प्रतीचीसत्रीं व मोसंबी विक्रीसाठी उपलब्ध आहते . ७० ते ८० रुपये प्रति डझन केळी विकली जात आहते. पपई वगळता सफरचंद, डाळिंब, चिकू, पेरू, ड्रॅगन फ्रुट, किवी चांगलाच भाव खात आहेत.

स्थानिक संत्री, मोसंबी, पपई, केळीसह अन्य फळांना ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. नवरात्रोत्सवात दरवर्षी फळांना मागणी असते. या वर्षीही मागणी वाढली असून, फळ विक्रीत नेहमीच्या तुलनते १० टक्के वाढ झाली आहे.

देऊळगाव राजा हायस्कूलच्या सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड!

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Comment