देऊळगाव राजा/ प्रतिनिधी
येथील देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे आयोजित या स्पर्धेत शाळेच्या सात खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१७ वर्षे वयोगटात कु. सुप्रिया विकास शिंदे हिने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १९ वर्षे वयोगटात कु. सृष्टी प्रभाकर डोईफोडे हिनेही गोळाफेक व थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावून दुहेरी यश संपादन केले.
याशिवाय, कु. श्रद्धा बद्रीनाथ खार्डे हिने २०० मीटर धावण्यात, कु. माधुरी दत्तात्रय गाडेकर हिने तिहेरी उडीत, निशांत प्रशांत अक्कर याने ४०० मीटर धावण्यात आणि शिवराज प्रभाकर काळुसे याने थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. नैतिक रामप्रसाद खार्डे याने थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. कोल्हे, उपमुख्याध्यापक डी. व्ही. जाधव व पर्यवेक्षक पी. के. राठोड यांनी क्रीडाशिक्षक एस. व्ही. मुळे आणि गुणवंत खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनीही खेळाडूंचे कौतुक केले. खेळाडूंची जिद्द, मेहनत आणि क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळे शाळेच्या क्रीडा वैभवात भर पडली असून, या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.







