बुलढाणा न्यूज

बुलढाण्यात राहणार्‍या उच्चशिक्षीत तरुणाने ऑनलाईनवर भलतच सर्च केले अन् पाच लाख रुपयांने त्यास गंडविले वाचा काय झालं …

      पाच आरोपीच्या ताब्यातुन 10 मोबाईल, 13 सिमकार्ड, 8 एटीएम कार्डसह चारचाकी व रोख रक्कम असा एकूण 7 लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देेमाल जप्त

         बुलढाणा – येथे राहणार्‍या एका उच्चशिक्षीत तक्रारदाराने दि.24/12/2023 रोजी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली की, त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर एक्सॉर्ट सर्व्हीस नावाने सर्च केले असता त्यांना वेगवेगळया वेबसाईट दिसल्या त्यांनी त्या वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन एक्सॉर्ट सर्व्हीस करीता विचारणा केली असता त्यांना चांगली सर्व्हीस पुरविण्यात येईल असे सांगुन त्याचेकडून वेगवेगळे चार्जेस करीता वेगवेगळया बँक खात्यावर पैसे मागवून घेतले व 5 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
                 सदर गुन्हयाचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली प्रल्हाद काटकर तत्कालीन पोलीस निरीक्षक सायबर पो.स्टे. बुलढाणा यांनी केला असुन गुन्हयाचे तपासात आरोपींनी वापरलेले वेगवेगळे बँक अकाउंट, मोबाईल नंबर, सिसीटीव्ही फुटेज, व आरोपींचे मोबाईल लोकेशनवरुन दि. 2 मार्च 2024 रोजी पोलीस अंमलदार शकील खान, राजदिप वानखडे, विकी खरात, केशव घुबे, संदीप राऊत, ऋषीकेश खंडेराव यांनी गुन्हयातील आरोपी दिवान जैनुल आबेदीन वय 20 वर्ष रा. अहमदाबाद, गुजरात, फुझेल खान रशिद खान पठाण वय 22 रा.अहमदाबाद, गुजराज, जीत संजयभाई रामानुज वय 25 वर्ष रा. अहमदाबाद, गुजरात, चिरागकुमार खोडाभाई पटेल वय 30 रा.मोरैया, अहमदाबाद, गुजरात, मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण वय 26 रा. अहमदाबाद, गुजरात यांना मंडाना, जि.कोटा, राजस्थान येथून ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातुन एकूण 10 मोबाईल, 13 सिमकार्ड, 8 एटीएम कार्ड, 1 होंडाई वरणा फोर व्हीलर व रोख 72 हजार 200 रुपयांचा असा एकूण 7 लाख 27 हजार 200 रुपयांचा मुद्देेमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधिक्षक सुनिल कडासने बुलढाणा, अपर पोलीस अधिक्षक बी.बी.महामुनी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सायबर पो.स्टे. सुनिल सोळंके बुलढाणा, पोलीस अंमलदार शकील खान, राजदिप वानखडे, विकी खरात, केशव घुबे, संदीप राऊत व ऋषीकेश खंडेराव हे करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें