बुलढाणा न्यूज

उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने पत्रकार लुकमान शाह, हनीफ खान सन्मानित

          बुलढाणा – महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कोथळी ग्रामपंचायत सदस्य लुकमान शाह व हनीफ खान यांना पत्रकारिता क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत पत्रकार व संपादक फाउंडेशनच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार भवन येथे दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी सन्मानित करण्यात आले. 
         यावेळी कार्यक्रमाला भारत गोवाळे, आमदार गितेश पांडे, राजेंद्र जैन, माजी आमदार अब्दुल समद मुंबई, सुरज सिंग ठाकूर, राजेंद्र पाठक, सुनील पांडे तसेच पत्रकार व संपादक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.सुशील पांडे जी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

         यापूर्वी लुकमानशा यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये त्यांना राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार, पत्रकार क्षेत्रातील विभागीय मुकनायक पुरस्कार, समाज सेवा पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार मिळाले आहेत. लुकमानशाह व हनीफ खान या दोघांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असुन त्याचे सर्व क्षेत्रातुन कौतुक होत.

Leave a Comment

और पढ़ें