बुलढाणा न्यूज

रिक्त असलेल्या ठिकाणी नव्याने रास्त भाव दुकाने मंजूर      

बुलढाणा न्यूज : बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ठिकाणी नव्याने रास्त भाव दुकाने परवाना मंजूर करण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून संबंधित गावात जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन रास्त भाव दुकान परवाने प्राथम्यानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. यात पंचायतमध्ये ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयं सहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे.
      बुलडाणा तालुक्यात बुलडाणा, दत्तपूर, चिखली तालुक्यात अमडापूर, सावरखेड बु., वाघापूर, सिंदखेड राजा तालुक्यात सोनोशी, बाळसमुद्र, देऊळगाव राजा तालुक्यात दिग्रस बु. देऊळगाव राजा येथे दोन, मेहकर तालुक्यात वडाळी, नानज, मोताळा तालुक्यात सांगळद, चिंचखेड खुर्द, डिडोळा खुर्द, शेगाव तालुक्यात महागाव, सांगवा, नांदुरा तालुक्यात दहिवडी, अंबोड, सावरगाव चाहू, भुईशेंगा, इसबपूर, नारायणपूर, रोटी, खातखेड, पिंपळखुटा खुर्द, जिगाव, हिंगणाभोटा, जळगाव जमोद तालुक्यात पळसखेड, आडोळ खुर्द, उसरा खुर्द, निमकराड, ईस्लामपूर, खामगाव तालुक्यात खामगाव येथे आठ, पिंपळगाव राजा, उमरा लासुरा, आमसरी, कुर्‍हा, मांडणी, शेंद्री, धापटी, चिखली खुर्द, नागझरी खुर्द, संग्रामपूर तालुक्यात सावळा, मारोड, दानापूर, इटखेड, शेवगा खुर्द, खळद, पंचाळा बु., हिंगणा कवठळ, भोन, धामनगाव, मनार्डी, निमखेड, लोणार तालुक्यात गुंधा, पिंपळनेर, लोणार, मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा बु., लासुरा येथे येथे नवीन रास्तदुकान परवाना मंजूर करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आर. एम. बसैय्ये यांनी कळविले आहे.

Leave a Comment

और पढ़ें