बुलढाणा न्यूज

अवैध धंदे विरोधात गणराज्य दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करणार आंदोलन

बुलढाणा: बुलढाणा शहरातील चर्चसमोर, जयस्तंभ चौक ते गॅरेज लाईन, सुवर्ण गणेश मंदिर समोर टाटा ग्राउंड मध्ये, सुंडदरखेड येथील होंडा शो रूम मागे, बाजार गल्लीतील शासकीय गाळ्यात, सार्वजनिक बांधकाम विभाग समोर, येळगाव फाटा , रायपूर,सैलानी, देऊलघाट, चिखली पोलिस स्टेशन हद्दीत शहरातील मध्यवस्तीत बाजार मार्केट येथे खुले आम, वरली, मटके, जुगार अड्डे, नगदी तकदिर का बादशहा असे एक नव्हें अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहेत. यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. यामुळे पत्रकार इसरार अहमद देशमुख, वॉर्ड नं 4 गवळीपुरा, पुरुषोत्तम बोर्डे यांनी अनेक बातम्या प्रकाशित केल्या आहेत व येथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक आंदोलन केले. मात्र येथील भ्रष्ट पोलिस प्रशासन आधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत, उलट तक्रार दाखल करणार्‍यास धमकी देऊन तक्रार माघे घेण्यास प्रवृत्त केले जाते. त्यामुळे सबंधित पोलिस स्टेशन आधिकारी कर्मचारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी व रायपूर, चिखली, बुलढाणा पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे, जुगार अड्डे, वरली, मटका बंद करावा, अन्यथा 26 जानेवारी पासून इसरार देशमुख व पुरुषोत्तम बोर्डे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत तीव्र आंदोलन करणार आहोत तसेच आंदोलन काळात तक्रार कर्त्यास काही इजा पोहचली, जिवित्वास हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन व अवैध धंदे माफिया यांच्यावर राहिल अशी तक्रार पत्रकार इसरार अहमद देशमुख बुलढाणा, पुरुषोत्तम बोर्डे युवा प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद महाराष्ट्र यांनी सर्व संबंधितांना दिली आहे.

Leave a Comment

और पढ़ें