बुलढाणा न्यूज

जिल्ह्यात एकूण 680 आपले सरकार सेवा केंद्र, ई-केवायसी करणाऱ्या केंद्रांची यादी जाहीर

महा ई-सेवा केंद्रामध्ये आधार, मोबाईल क्रमांकाचे प्रमाणीकरण करून घ्यावे –  जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

A list of 680 Apna Sarkar Seva Kendras, e-KYC centers in the district has been announced

          बुलडाणा, (जिमाका)-  राज्य शासनाच्या विविध सेवा, योजनांचा‌ लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी -विद्यार्थिनी, विविध शासकीय योजनांस पात्र लाभार्थी यांनी नजिकच्या आपले ई सेवा केंद्र, बँक, पोस्ट ऑफिस येथे जावून आपापल्या खात्यांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण (ईकेवायसी) करून घ्यावे; जेणेकरून विविध शासकीय योजनांचा लाभ थेट बँक खात्यात हस्तांतरित होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 
            नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासन संबंधित यंत्रणेमार्फत त्यांचे पंचनामे करत आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त मदतीसाठी शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण (ekyc) करण्याकरिता जिल्ह्यातील कार्यान्वित तालुकानिहाय आपले सरकार सेवा केंद्रांची यादी खालील लिंक वर उपलब्ध आहे.  https://buldhana.nic.in/
तसेच DIT आधार केंद्र यादी सुद्धा उपलब्ध असून, जिल्ह्यात एकूण 680 आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. तसेच 86 DIT आधार केंद्र कार्यान्वित आहे. तरी वंचित लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन प्रमाणीकरण प्रक्रिया करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
           जिल्ह्यात तालुकास्तरावर आपले सरकार सेवा केंद्र ३०६ असून, ग्रामपंचायत स्तरावर ३७४ असे एकूण ६८० महा ई सेवा केंद्र आहेत. केवळ आधार, मोबाईल क्रमांकांचे प्रमाणीकरण न केल्यामुळे नागरिकांना लाभापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे त्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
           
           नागरिकांच्या सोईसाठी नजिकच्या आपले सरकार महा ई सेवा केंद्रांची यादी सोबत देण्यात आली असून, त्याचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
बुलढाणा शासनाच्या लाभासाठी शेतकरी, विद्यार्थी आणि इतर घटकांसाठी ई-केवायसी आवश्यक करण्यात आली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना देण्यात येणार लाभ आणि मदत ही ई-केवायसीवर आधारीत करण्यात आली आहे. ई-केवायसी करण्यात अडचणी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील ई-केवायसी करणाऱ्या केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
              बुलडाणा तालुक्यात प्रवीण पाटील (९४२२७४३९०८) तहसील कार्यालय, बुलडाणा, सतीश किलबि (९६८९३२९९८१) जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा, संजय तायडे (९९२२६८२२९१) ग्रामपंचायत कार्यालय, चांडोल, प्रवीण वाघ (९९२२६८२२९१) ग्रामपंचायत कार्यालय, तराडखेड, विशाल गावंडे (९७६३८१९५८७) ग्रामपंचायत कार्यालय, सावळी, अमोल तंबडे (८९७५६५५५९४) ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव, परमेश्वर ऊबरहांडे (९९२२६८२२९१), ग्रामपंचायत कार्यालय, हतेडी, बु. यांचा‌ समावेश आहे. 
           चिखली तालुक्यात अनिल इंगळे (९९२३६८६१११) नगर परिषद कार्यालय, चिखली, तेजराव शेजूळ (९६०४४९०८००) पंचायत समिती कार्यालय, चिखली, पुरुषोत्तम पडघान (९४२३०५३०७९) ग्राम पंचायत कार्यालय, मेरा खुर्द, ‘नंदकिशोर गोडवे (९६५७३८३५२२) ग्रामपंचायत कार्यालय, बेराळा, राम चव्हाण (९०४९३०७०३०) ग्राम पंचायत कार्यालय, उंद्री, सुनील राठोड (९६०४४४३०४८) ग्राम पंचायत कार्यालय, महोदरी, पुरुषोत्तम चिंचोले (९३०७००६९१३) ग्रामपंचायत कार्यालय, एकलारा.
 
           देऊळगावराजा तालुक्यात सिद्धेश्वर नागरे (९७६७४५५१३३) तहसील कार्यालय, देऊळगाव राजा, संतोष डोंगरे (९६७३१३४८६४) उपनिबंधक कार्यालय, देऊळगावराजा, कृष्णा सोनुने (९६७३१३४७६८) पंचायत समिती कार्यालय, देऊळगावराजा, भारत कोल्हे (९६७३७२०२१२) नगर परिषद कार्यालय, देऊळगावराजा, सुरेश शेळके (९९२२८९९१३१) ग्रामपंचायत कार्यालय, देऊळगावमही, अनंता जायभाये (९१५८०९२१५३) ग्रामपंचायत कार्यालय, सावखेड नागरे यांचा‌ समावेश आहे.
           सिंदखेडराजा तालुक्यात निलेश राठोड (९९२१२५१५५४) तहसील कार्यालय सिंदखेड राजा, जयश्री वाघमारे, (९७३०९८३१०२) पंचायत समिती कार्यालय, सिंदखेडराजा, संदीप नालेगावकर (९८६००६५४८४) ग्रामपंचायत कार्यालय, शेंदुर्जन, अमोल देशमुख (९७६६४२९४३७) ग्रामपंचायत कार्यालय, दुसरबीड, प्रताप जाधव (९४२०४५८१८२) ग्रामपंचायत कार्यालय, जांभोरा, शेख अन्सार शेख सत्तार (९५४५२३०००६) ग्रामपंचायत कार्यालय, साखर खेर्डा तर
      लोणार तालुक्यात भारत दराडे (९०११३६५००४) तहसील कार्यालय लोणार, श्रीराम गायकवाड (८००७५०८८४६) ग्रामपंचायत कार्यालय, किनगाव जट्टू, पंढरी वाघ (९६०४०५८८१९) ग्रामपंचायत कार्यालय, अंजनी खुर्द, विजय खेत्री (९८२२३०३२६४) ग्रामपंचायत कार्यालय, सुलतानपूर, आशिष चव्हाण (९६६५४०४९००) ग्रामपंचायत कार्यालय, तांबोळा, संदिपकुमार राठोड (९७६७४५४८३९) ग्राम पंचायत कार्यालय, देऊळगाव कुंडपळ
          मेहकर तालुक्यात विश्वास वाघ (८६०००७३७७७) तहसील कार्यालय मेहकर, संतोष वाघ (९५११८९६५५५) नगर परिषद कार्यालय मेहकर, मनोहर सरोदे (९८२२३७३६१०) ग्रामपंचायत कार्यालय, चायगाव, राजकिरण खरात (९९२२१८२९४७) ग्रामपंचायत कार्यालय जानेफळ, योगेश बोंद्रे (९०११७१०५४१) ग्राम पंचायत कार्यालय, डोणगाव, संतोष वाघ (९५११८९६५५५) ग्रामपंचायत कार्यालय, उकळी, शिवांजी साबळे (९७६७२८५०७१) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा साबळे, पुरुषोत्तम नवले (९९२२०९६१९७) ग्रामपंचायत कार्यालय, घाटबोरी आशिष धारतरकर (९४२१४६१००६) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा आश्रम, रणधीर खरात (९९२२१८२९४७) ग्रामपंचायत कार्यालय, हिवरा खुर्द, भगवान चिखलकर (९४२२९४९७८५) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी माध्यमिक शाळा, डोणगाव, अमोल ठाकरे (९८२३३७६२३३) जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, डोणगाव.
          खामगाव तालुक्यात प्रवीण खारोडे (९७६७६४४७११) उपविभागीय कार्यालय, खामगाव, प्रशांत पाचपोर (७३५०६१७१९४) उपविभागीय कार्यालय, खामगाव, प्रतिक खुपसे (८२७५२३२९१०) नगर परिषद कार्यालय, खामगाव; गजानन महाले (९८२२७२७६४९) ग्राम पंचायत कार्यालय, अटाळी, सुनिल गवारगुरु (७९७२०७६५३८) ग्राम पंचायत कार्यालय, पिंपळगाव राजा, पवन वेरुळकर (९४०४५५३३१५) ग्राम पंचायत कार्यालय, रोहणा, शेख राजू शेख – जहांगीर (९६८९३५०६७०) ग्रामपंचायत कार्यालय, गणेशपूर, निलेश सरदार (८६००६६९९६४) ग्रामपंचायत कार्यालय, लाखनवाडा आदी समाविष्ट आहेत. 
       शेगाव तालुक्यात अजित सानप (९४२२९९३९८३) तहसील कार्यालय, शेगाव, किशोर जुमले (७०२०३४५७०८) नगर परिषद कार्यालय, शेगाव, प्रकाश कळसकर (९८५०५२९८१८) ग्रामपंचायत कार्यालय, जवळा पळसखेड, सुनील  गावंडे (९७६३५६१८१०) ग्रामपंचायत कार्यालय, पहुरजीरा,
      जळगाव जामोद तालुक्यात झिकरुल्ला खान झियाउल्ला खान (९९२१९०१३९०) तहसील कार्यालय, जळगाव जामोद, योगेश राऊत (९७६३३१३३१०) ग्रामपंचायत कार्यालय, पिंपळगाव काळे, वैभव शेळके (९८६०२२३३८३) ग्रामपंचायत कार्यालय, खेर्डा खुर्द, अझरूद्दीन झियाउद्दीन शेख (९८८१५६४५६७) ग्रामपंचायत कार्यालय, माडाखेड बु.
        मलकापूर तालुक्यात दीपक तायडे (८६६८४३५२५०) नगर परिषद कार्यालय, मलकापूर, मोहन घाटे (७५८८८०४३९८) उपविभागीय कार्यालय, मलकापूर, नंदा क्षीरसागर (९८२२७७४७४१) नगर परिषद शाळा क्र. २, पारपेठ, मलकापूर, हरीदिगंबर हिवाळे (९८८१६२०४८१) पंचायत समिती कार्यालय, मलकापूर, गजानन प्रकाश गवई (९७६६१३१३७३) तलाठी साझा – भाग क्र. ३, मलकापूर, मनोज झनके (९५४५८०३७१२) नगर परिषद उर्दू कन्या शाळा, मलकापूर, राजेंद्र वाघाळे (९६०४५५६१०६) ग्राम पंचायत कार्यालय, जांभूळढाबा, विजय पाटील. (९६६५१७४३०६) ग्रामपंचायत कार्यालय, दाताळा समावेश आहे.
        नांदुरा तालुक्यात प्रशांत दिवरे (९७३०१७४४१६) तहसील कार्यालय, नांदुरा, प्रशांत वाकोडे (९६८९७१७३५३) पंचायत समिती कार्यालय, नांदुरा, कैलाश साबे (९८८१३८३२४२) शासकीय रुग्णालय, नांदुरा, अक्षय हेलगे (९९२३९४७६१०) नगर परिषद कार्यालय, नांदुरा, विजय गणगे (९४२११०५५४६) ग्राम पंचायत कार्यालय, खैरा, योगेश शाळीग्राम खंदारे (९९२१४७३७२७) ग्राम पंचायत कार्यालय, निमगाव, कैलाश मानकर (९६८९३४७५०५) ग्राम पंचायत कार्यालय, चांदूर बिस्वा, दिलीप बावस्कर (९४०४४४३७५५) ग्रामपंचायत कार्यालय, वडनेर भोलाजी.
        मोताळा तालुक्यात अरुण वाघ (८७८८२६१९३८), तहसिल कार्यालय मोताळा, सय्यद वसीम सय्यद समद (८६००२१३१२४) नगर पंचायत कार्यालय मोताळा, नितीन फेंगडे (९९६०५८४७७०) ग्रामपंचायत कार्यालय, माकोडी, सागर हागे (९९६००८६१७४) ग्रामपंचायत कार्यालय, धामणगाव बढे, महादेव राहण् (९६५७४८६३४२) ग्रामपंचायत कार्यालय, पान्हेरा खेडी, रितेश जैन (९५०३१५९९१४) ग्रामपंचायत कार्यालय, शेलापूर समावेश आहे. 
        संग्रामपूर तालुक्यात शाम मिरगे (७५८८८०९८६८) तहसील कार्यालय, संग्रामपूर, शेख गुलाम मोहंमद अल्ताफ (९५०३१५९९०४) पंचायत समिती कार्यालय, संग्रामपूर, पवन खंडेराव (९६६५२९६१८३) ग्राम पंचायत कार्यालय, कवठळ, कुशल वडे (९९२३३०३१९८) ग्राम पंचायत कार्यालय, पातुर्डा या केंद्रावर जाऊन नागरिकांनी ई-केवासी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

Leave a Comment

और पढ़ें