बुलढाणा न्यूज

अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर, मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित

अंगणवाडी सेविका व मदतनीस विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर, मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित

       महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सोमवार, दि.4 डिसेंबर 2023 पासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. या बंद संपामुळे अंगणवाड्या कुलूप बंद असल्याने अंगणवाडीतील मुले-मुली शिक्षण व पोषणआहारापासून वंचित झाले आहे. अंगणवाडीमध्ये सहा वर्ष वयोगटातील मुले अंगणवाडीमध्ये जातात. तीन ते सहा वयोगटातील मुलांना शिकवले जाते. या सर्व मुलांना अंगणवाडीमध्ये पोषण आहार दिला जातो. तसेच अंगणवाडी सेविकां गरोदर माता यांना घरपोच आहार पुरवितात. या सोबतच अंगणवाडी सेविक गरोदर मातांना लसीकरण करून घेणे त्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा देणे. गरोदर स्तनदा मातांच्या घरी जाऊन स्वच्छता आहाराविषयी आरोग्य विषयी जनजागृती करुन गरोदर महिलांना मार्गदर्शन करतात. शासनाच्या योजनेची माहिती प्रत्येक घरामध्ये पोहोचवितात. 

        या सोबतच अंगणवाडीतील मुलांचे प्रत्येक महिन्याला वजन उंची घेतले जाते. त्यानुसार कुपोषणाचा दर्जा कमी करण्याचे काम अंगणवाडी सेविका मार्फत केले जाते. यासोबतच दर महिन्याला पोषण सुधारणे बाबत कार्यक्रम घेऊन महिलांना मार्गदर्शन केले जाते. अंगणवाडीचे प्रत्येक काम ऑफलाईन व ऑनलाईन हे दोन्ही कामे अंगणवाडी सेविका यांना करावी लागतात. या व्यतिरिक्त शासनाच्या सर्व योजनांचे काम त्यांना करावी लागते तसेच मदतनीस यांना पोषण आहार शिजवणे मुलांना घरून बोलावून आणणे अंगणवाडीची साफसफाई ठेवणे अशी कामे त्यांना करावी लागता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते आहे, सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युएटी व अंगणवाडी सेविका हे पद वैधानिक कर्मचारी म्हणून घोषित करावे. त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला निर्देश दिलेले असताना सुद्धा शासन या निर्देशाची अंमलबजावणी करत नाही तसेच अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात केंद्र शासन व राज्य शासन वाढ करत नाही. त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्यामुळे अंगणवाडीतील मुले , गरोदर माता, स्तनदा माता आहारापासून वंचित राहून कुपोषण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या बेमुदत संपाची दखल घेण्याची गरज आज रोजी आहे. अन्यथा यांचे परिणाम येणार्‍या पिढयांना भोगावे लागतील.

एक महिन्यानंतर मंत्र्यांच्या घरावर आशा व गटप्रवर्तक धडक देतील

Leave a Comment

और पढ़ें