बुलढाणा न्यूज

भरडधान्याचे आधारभूत किंमत जाहिर, मकाला 2 हजार 500 रुपये | Basis price of food grains announced

              बुलढाणा न्यूज – केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम 2023-24 चे खरेदी योजनेंतर्गत भरडधान्याचे किमान आधारभुत किंमत जाहिर केले आहे. भरडधान्याला चांगला हमीभाव मिळत असून शेतकरी बांधवानी पारंपारिक पिका ऐवजी ज्वारी, बाजरी, मका व रागी पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

भरडधान्याचे आधारभूत किंमत

ज्वारी संकरीत 3 हजार 180 रुपये
ज्वारी मालदांडी 3 हजार 225 रुपये
बाजरी 2 हजार 500 रुपये
मका 2 हजार 090 रुपये
रागी 3 हजार 846 रुपये आधारभूत किंमत जाहिर केले आहे.

केंद्राने जाहिर केलेल्या आधारभूत किंमतीचा शेतकर्‍यांना लाभ मिळावा यासाठी राज्यात खरेद्री केंद्र सुरु केले आहे. शेतकर्‍यांनी शेतमाल हमी भावापेक्षा कमी किंमतीत न विकता खरेदी केंद्रात विक्री करावी. अधिक माहितीसाठी स्थानिक जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
– मनोजकुमार ढगे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,बुलढाणा.

Leave a Comment

और पढ़ें