बुलढाणा न्यूज

बुलढाण्याच्या प्रणालीचे राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत यश

nnouncement-of-System-Shegokar-as-Brand-Ambassador-for-AIDS-Awarenes

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत Chief Minister Dr. Pramod Sawant, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे  Health Minister Vishwajit Rane यांच्या हस्ते पुरस्कारे सन्मानित

            बुलढाणा न्यूज – राष्ट्रिय एड्स नियंत्रण संस्था व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या वतीने आंतर राष्ट्रिय युवा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावरील विजेत्यांना राज्यस्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर रोजी पुणे येथे संपन्न झाली. या राज्यस्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत मातृतिर्थ बुलढाणा जिल्हयाची लेक प्रणाली शेगोकार हीने पणजी गोवा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रिय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला आहे. तिने मातृतिर्थ बुलढाणा जिल्हयाचे तसेच महाराष्ट्र राज्याच्या नावलौकीकात भर घातली असून स्पर्धेतील विजेत्यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

nnouncement-of-System-Shegokar-as-Brand-Ambassador-for-AIDS-Awarenes
          या स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्हयातील प्रणाली शेगोकार मुलींमध्ये प्रथम आली तिला राष्ट्रिय स्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात आले. गोवा येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये तिचा तृतिय क्रमांक आला. ग्रामिण भागाची पार्श्वभुमी असतांना सुध्दा राष्ट्रिय स्तरावरील स्पर्धेमध्ये मिळालेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे.
            पुरस्कार महावितरण कार्यक्रमाला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या महा. निपेशक श्रीमती हेकाली झिमोली, संचालक श्रीमती निधी केसरवाणी, गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ गोकुळदास सावंत, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सहसंचाले उमेश घुगे, सहाय्यक संचालक अनुराग कुळकर्णी, पुणे जिल्हा पर्यवेक्षक शितल शेंडे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, बुलढाणाचे प्रतिनिधी भागवत कव्हळे व विविध राज्यातील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रसाद भंडारी यांनी प्रणाली शेगोकार हिचे अभिनंदन केले असुन संस्थेच्या वतिने तिचा सत्कार जागतिक एड्स दिना दिवशी करण्यात येईल व तिला युवकांमध्ये एच.आय.व्हि / एड्स जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सन्मान देण्यात येईल याची घोषणा केली. बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी सुध्दा प्रणालीचे अभिनंदन केले व सदिच्छा दिल्यात.

युवकांमध्ये एच.आय.व्हि / एड्स जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून प्रणाली शेगोकार हिच्या नावाची घोषणा

या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्हयातील प्रणाली शेगोकार ही मुलींमध्ये प्रथम आली तिला राष्ट्रिय स्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये गोवा येथे संपन्न झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिचा तृतिय क्रमांक आला असून ग्रामिण भागाची पार्श्वभुमी असतांना सुध्दा राष्ट्रिय स्तरावरील स्पर्धेमध्ये मिळालेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रसाद भंडारी यांनी प्रणाली शेगोकार हिचे अभिनंदन केले असुन संस्थेच्या वतिने तिचा सत्कार जागतिक एड्स दिना दिवशी करण्यात येईल व तिला युवकांमध्ये एच.आय.व्हि / एड्स जनजागृतीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सन्मान Announcement of  pranali  Shegokar as Brand Ambassador for AIDS Awareness देण्यात येईल याची घोषणा केली.

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये एकूण 98 जागांची भरती

https://buldhananews.com/1343/

Leave a Comment

और पढ़ें