बुलढाणा न्यूज

कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे तीन दिवसीय प्रशिक्षण

Buldana Urban Three Day Training Program

गाई, म्हैस, शेळी, खेकडा, वराह पालन प्रशिक्षण कार्यक्रम (Cow, Buffalo, Goat, Crab, Boar Training Program)

              

Buldana Urban Three Day Training Program
Buldana Urban Three Day Training Program

बुलढाणा न्यूज – येथील बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा व पुणे येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र Agricultural Science Centre

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुधवार, दि. 11 ऑक्टोबर ते दि.13 ऑक्टोबर 2023 या तिन दिवसीय गाई, म्हैस, शेळीपालन, खेकडा, वराह पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे पार पडला.               या उदघाटन कार्यक्रमास  Buldana Urban बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, म. बुलडाणा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुकेशजी झंवर Dr. Sukesh Zhanwar, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाचे डॉ.अनिल तारू, विभाग प्रमुख (प्रशिक्षण) एमसीडीसी पुणे येथील श्री.डी.एम.साबळे तसेच डोंगरखंडाळा गावचे सरपंच श्री.बबनराव गाडगे, तज्ञ व्याख्याते श्री.ऋषीकुमार फुले पुणे, विषय तज्ञ डॉ.एन.एस.देशमुख, डॉ.जगदीश वाडकर, श्री.अभय पावडे, श्री.अनिल देशपांडे यांचे इतर मान्यवरांची उपस्थित होती. 

              याप्रसंगी बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुकेश झंवर यांनी देश विदेशातील अनेक उदाहरणे देऊन कोणताही व्यवसाय अर्थक्षम करण्यासाठी त्यासाठी येणारा खर्च व येणारे उत्पादन यांचा ताळमेळ ठेवणे गरजेचे असते, परंतु शेती हा परंपरागत व्यवसाय आहे. तो तोट्यात जातो म्हणून सोडू शकत नाही, त्यावर आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते अशा स्थितीत आधुनिक पद्धतीने शेती करून पर्यायी संधीचा शोध घेणे गरजेचे आहे असे सांगितले.

                 याकरीता शेतीला जोड धंदा म्हणून आपण गाय, म्हैस, शेळी, मत्स्य, वराह, खेकडा पालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केलेले आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे यांनी तज्ञ व्याख्याते आणून प्रशिक्षण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. आता आपल्याला मेहनत करण्याची क्षमता व प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच आपण या व्यवसायांमध्ये यशस्वी होऊ शकतो असे सांगितले.

            डॉ.अनिल तारू यांनी सेंद्रिय खताचा अभाव, त्यामुळे शेतीतील कमी होणारे नत्राचे प्रमाण त्यामुळे पुढील पिढीला आपण काय देणार याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे. यासाठी शेळीपालन, म्हैस पालन यासारखे पूरक व्यवसायची कास धरून उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतीचा समतोल साधता येईल असे सांगितले.
     

   कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये दिगंबर साबळे यांनी महाराष्ट्रातील साठ ते सत्तर टक्के शेतजमीन ही कोरडवाहू आहे. म्हणजेच पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे. अशा मध्ये शेतीचा विकास करताना अनेक समस्यांना शेतकरी सामना करत आहे. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वातावरणातील बदल अशा बदलत्या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे व परिणामी उत्पन्नामध्ये घट होत असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने अनेक शेतकरी जीवनामध्ये नैराश्याचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जोडधंद्याची साथ देऊन परिस्थितीवर मात करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच त्यांनी बुलडाणा अर्बन बँकेने सुरू केलेल्या या प्रशिक्षणाच्या चळवळीचे स्वागत केले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने आत्तापर्यंत बुलडाणा अर्बन बँकेच्या आर्थिक साह्याने 200 हून अधिक शेतकर्‍यांना विविध शेतीपूरक व्यवसायांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिलेले आहे.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.अनिल देशपांडे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.मयूर शेळके, श्रीमती शुभांगी भोलनकर , श्री.युवराज खोपडे , बुलडाणा अर्बनच्या सर्व अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राच्या सर्व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले होते हे विशेष! 

 

Leave a Comment

और पढ़ें