बुलढाणा न्यूज

आंतरराष्ट्रीय नायजेरीयन सायबर गुन्हेगारांना बुलढाणा पोलीसांनी दिल्ली येथुन केली अटक

फिर्यादीची 62 लाख 69 हजार 700 रुपयांची ऑनलाईन फसवणूक Online fraud

           बुलढाणा न्यूज – दि.15 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदार दिपक शिवराम जैताळकर, मेहकर यांनी रिपोर्ट दिला की, दिनांक 23 जून 2023 रोजी फिर्यादी हे फेसबुक अकाउंट चेक करीत असता त्यांना अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली व त्यांनी ती स्वीकारली असता अनोळखी महिलेने लंडन येथील असून भारत देशाविषयी प्रेम व्यक्त करून ओळख निर्माण केली व तक्रारदार यांचेशी मैत्री झाली असल्याने ती खुप खुश झाल्याने त्यांना 65000 ग्रेट ब्रिटिश पाउंडचे गिफ्ट पार्सल पाठवीत असल्याचे सांगितले. ते पार्सल दिल्ली एअरपोर्ट येथून सोडून घेण्यासाठी दिनांक 13 जुलै 2023 रोजी ते 9 ऑगस्ट 2023 या कालावधीत कस्टम क्लिअरन्स चार्जेस पाठवलेली रक्कम भारतीय चलनात रूपांतर करण्यासाठी कन्वर्जन फी, मास्टर कार्ड पाठवण्यासाठी, ज्युडीशीअल कौन्सिल कडून मंजुरी मिळविण्यासाठी, मास्टर कार्ड अपडेट करण्यासाठी व इतर विविध प्रोसेसिंग फी भरण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक वरून व व्हॉट्सअप तसेच ई-मेल द्वारे रक्कम पाठविण्यास सांगितल्याने तक्रारदार दिपक जैताळकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची वेगवेगळ्या बँकांचे खात्यामधून आरटीजीएस, चेक व फोन पे द्वारे एकूण 62,69,700/- रुपये ऑनलाईन पाठविले.
परंतु त्यांना गिफ्ट पार्सल त्यांचे पत्त्यावर मिळाले नसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यांचे तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे अपराध क्रमांक 37/2023 कलम 420, 465, 468, 470, 471 भारतीय दंड संहिता सह कलम 66 क, 66 ड माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे.

           सदर गुन्ह्याचे स्वरुप हे क्लिष्ट व तांत्रिक गुंतागुंतीचे असल्याने श्री.सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी सदर गुन्ह्याचा तपास तात्काळ करण्याकरीता पोलीस निरीक्षक अशोक लांडे स्था. गु.शा व पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रभारी अधिकारी विलासकुमार सानप सहा. पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक यांनी सायबर पोलीस स्टेशन सोबत समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले.
     

        सायबर पोलीस स्टेशन व तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी गुन्ह्याचे तपासाकरीता तक्रारदार यांनी ऑनलाइन पाठविलेल्या रकमेचे विविध बँक अकाउंट, एटीएम फुटेज, फेसबुक अकाऊंट, ओला सर्व्हिस, पेटीएम, फोन पे, गूगल अकाउंट, गुगल पे, इंडीगो एअरलाईन, इंशोरन्स कंपनी, फिलपकार्ट व इतर ईकॉमर्स वेब साईट्स व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरील कंपन्यांकडुन गुन्ह्यासंबंधाने वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती प्राप्त केली व सदर तांत्रिक माहितीचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करुन आरोपी हे धंतीया, बरेली (उत्तरप्रदेश), बुरारी नगर, संत नगर (दिल्ली), दिमापुर (नागालँड) येथे असल्याचे व ते वापर करीत असलेले सिमकार्ड व मोबाईल नंबर हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असल्याचे तांत्रिक विश्लेषण विभागाने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

हे आहे तपास पथक

विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरीक्षक, पोहेकॉ ज्ञानेश नागरे, सायबर पोलीस स्टेशन, पोना दिपक जाधव,सायबर पोलीस स्टेशन, पोलीस अंमलदार गजानन गोरले, स्थानिक गुन्हे शाखा, पोकॉ ऋषीकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा,

तांत्रिक विश्लेषण पथक

पोहेकॉ राजु आडवे, पोकॉ कैलास ठोंबरे, पोकॉ अमोल तरमळे यांचा समावेश होता.

अटक करण्यात आलेले आरोपीची नावे

1) निजोस फ्रँक (Nijos Frank) वय 30 वर्षे, रा. संतनगर बुरारी दिल्ली (मुळ नायजेरीयन)
2) अलाई विन्संट (Alai Vincent) वय 32 वर्षे रा. संतनगर बुरारी दिल्ली (मुळ नायजेरीयन)

अशी होती आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत

फेसबुकवर खाते तयार करुन भारतीय पुरुष व महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर संबंधीत व्यक्तीशी भावनिक नाते निर्माण करणे., आरोपी हे इंटरनेटच्या साह्याने व्हर्च्यूअल नंबर खरेदी करुन विदेशातुन बोलत असल्याचे भासवतात., फेसबुक व व्हॉट्सअप द्वारे चॅटिंग करुन प्रेम व्यक्त करुन गिफ्ट पाठविण्याचा बहाणा करुन फसवणुकीला सुरुवात करतात, वेगवेगळया राज्यातील व्यक्तीचे नावे असलेले मोबाईल सिमकार्ड, बँक खाते, मोबाईल हॅन्डसेट जास्तीचे पैसे देवुन खरेदी करतात., फिर्यादीला आपण विमानतळावरुन कस्टम अधिकारी बोलत असुन आपणास आलेले गिफ्ट दिल्ली एअरपोर्ट वर आले असुन त्यामध्ये परदेशी चलन असुन ते अवैध मार्गाने आले असल्याने त्याबाबत आपणास कस्टम क्लिअरंस चार्जेस भरावे लागतील नाही भरल्यास आपणावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, अशी भिती दाखवितात व फसवणुक करतात.

 

Leave a Comment

और पढ़ें