बुलढाणा न्यूज

शॉटसर्किटमुळे फोटो स्टुडीओ जळुन खाक

बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील घटना

बुलढाणा शहरापासुन अवघ्या काही अंतरावर असलेल्या देऊळघाट येथील अनिल काटेकर यांचा फोटो फास्ट स्टुडीओला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. या आगीत एक ड्रोन व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. तसेच स्टुडीओमध्ये दोन महागडे फोटो व शुटींगचे कॅमेरे जळून खाक झाले आहे. या घटनेत दुकान मालकाचे जवळपास सहा लाखाचे वर नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी, दि.19 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्रीचे सुमारास घडली आहे.

           देऊळघाट येथील अब्दुल इब्राहिम कय्यूम यांनी बसस्थानक परिसरातील आपल्या मालकीच्या जागेत व्यावसायीक गाळे बांधले आहेत. त्यापैकी तीन क्रमांकाचा गाळा अनिल धोंडु काटेकर यांनी भाडे तत्वावर घेवुन त्यामध्ये फोटो स्टुडीओचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान मंगळवारी मध्यरात्रीचे सुमारास अचानक शॉट सर्कीट होवुन फोटो स्टुडीओला आग लागली. रात्रीची वेळ असल्याने या आगीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. त्यामुळे काही वेळातच फोटो स्टुडीओ ची राख झाली. या आगीत 45 हजार रुपये किंमतीचा फोटो कॅमेरा, 1 लाख 55 हजार रुपये किंमतीचा शुटींग कॅमेरा, 2 लाख रुपये किंमतीचा कॅनॉन कॅमेरा, 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचा ड्रोन कॅमेरा, 30 हजार रुपये किंमतीचे मॉनिटर, 50 हजार रुपये किंमतीचे दोन फॅन, रिंग लाईट, फ्लॅश लाईट, 30 हजार रुपये किंमतीचे शटर व कॉऊंटर व रोख 12 हजार रुपये असा एकुण सहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीच्या सर्व वस्तु जळुन खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी बुधवार, दि.20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. अनिल काटेकर यांना शासनाकडून आर्थीक मदत देण्यात यावी, अशी मागणी फोटोग्राफर बांधवांकडून होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें