बुलढाणा न्यूज

कुठे झाली 105 किलो वजनाची चांदीची मुर्ती तयार?

खामगाव – बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहराला देशातच नव्हे तर प्रदेशात ही शुद्ध आणि विश्वासहर्तेद्वारे चांदीचे शहर (रजत नगरी ) म्हणून ओळखले  गेले आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहराला रजत नगरीच्या बहुमान मिळवून देण्यासाठी जांगिड कुटुंबीयांचे योगदान आहे. राजस्थान मधील रामगड येथील रहिवासी स्व.केशव रामजी जांगिड यांनी राजस्थान येथून आल्यानंतर सन 1890 पासून राजस्थानच्या हस्तकला परंपरेला शुद्ध चांदीच्या भांड्यावर आणि श्रम कौशल्याने अशा प्रकारे कारागिरी करून ग्राहकाचे मन जिंकले.

जांगिड कुटुंबियातील श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगाव येथे चांदीचे मंदिर, चांदीचे दरवाजे, हनुमानजी ची आकर्षक मूर्ती याच सोबत श्री लक्ष्मी चांदीचे नाणी इत्यादी शुद्ध चांदीचे संपूर्ण काम केले आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे 31 किलो चांदीची श्री गणेशची मूर्ती तयार करून देण्यात आली होती. यंदा जालना येथील अनोखा गणेश मंडळला शुद्ध चांदीची अंदाजे 105 किलो वजनाची श्री गणेशजी ची आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली. ह्या मूर्तीला बनविण्याकरिता तिन ते चार महिन्याचा कालावधी ला गला आहे. तर चार ते पाच कारागिरांनी आता परिश्रम करून आपल्या कला कौशल्याने या मुर्तीला निर्मित केले आहे . तसेच ही आकर्षक मूर्ती दि.18 सप्टेंबर 2023 रोजी जालना येथील अनोखा गणेश मंडळ मुर्ती स्थापन्या करिता घेऊन गेले आहे, अशी माहिती श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे संचालक राहुल कमल जांगिड यांनी दिली आहे. श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस येथे निर्मित करण्यात आलेली 105 किलो वजनाची आकर्षक चांदीची श्री गणेशजीची मूर्ती जालना येथील अनोखा गणेश मंडळ येथे स्थापित झाली आहे. या मुर्तीचे मुल्य 80 लाख रुपये एवढे आहे. त्यामुळे जिल्हयासह महाराष्ट्रात या मुर्तीची चर्चा एकावयास मिळत आहे.

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जांगिड सन्मानित
राजस्थानचे हस्तकला कौशल्य व शुद्धतेचे कौशल्य जपत रतन जांगिड, जगदीश जांगिड , राधेश्याम जांगिड आणि प्रदीप जांगिड यांनी मिळालेल्या वारशाला उंचशिखरावर नेऊन ठेवले

आहे, म्हणूनच जांगिड परिवाराचे दि.31 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगावचे संचालक डॉ.कमल जगदीश प्रसाद जांगिड यांना महाराष्ट्र जन गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने सन 2013 मध्ये जगदीश प्रसाद चिरंजीलाल जांगिड यांना व्यापाररत्न सन्मानपत्र देऊन सन्मानित केले होते.

मागील वर्षी 31 किलो चांदीची श्री गणेशची मूर्ती केली होती तयार
श्री विश्वकर्मा सिल्वर हाऊस खामगाव येथे चांदीचे मंदिर, चांदीचे दरवाजे, हनुमानजी ची आकर्षक मूर्ती याच सोबत श्री लक्ष्मी चांदीचे नाणी इत्यादी शुद्ध चांदीचे संपूर्ण काम केले आहे. गेल्या वर्षी औरंगाबाद येथे 31 किलो चांदीची श्री गणेशची मूर्ती तयार करून देण्यात आली होती. यंदा जालना येथील अनोखा गणेश मंडळला शुद्ध चांदीची अंदाजे 105 किलो वजनाची श्री गणेशजी ची आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली.

Leave a Comment

और पढ़ें