खामगाव- अमडापूर-उदयनगर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने एका 25 वर्षीय युवकावर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली.
स्वप्निल गजानन लहाने (25), रा. मंगरूळ नवघरे, सध्या रा. छत्रपती संभाजीनगर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निल दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेला असताना तेथील काही जणांशी त्याचा वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या हिंसेत होऊन टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात स्वप्निल गंभीर जखमी झाला असून अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


