बुलढाणा न्यूज

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे शुक्रवारी बुलढाणा जिल्हयात

बुलढाणा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राहणार उपस्थिती

           बुलढाणा न्यूज- देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमानाने  देऊळगावराजा येथे शुक्रवार रोजी दि.13 ऑक्टोंबर रोजी येणार आहेत. यानिमित्त कृषी मेळावा व बळीराजा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.
          सहकार महर्षी  स्व.भास्करराव शिंगणे यांची पुण्यतिथी निमित्त विदर्भ मार्केटिंग फेडरेशन व देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच बुलढाणा जिल्हयाचे नवनियुक्त पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून दुग्ध व्यवसाय तज्ञ डॉॅक्टर बाबासाहेब ठोंबरे, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

        तरी आयोजित कृषी मेळावा व बळीराजा सन्मान सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी Caste Certificate Verificationअर्ज करावेत

पुनर्रचित हवामानावर आधारीत विमा योजना

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार

ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक

Leave a Comment

और पढ़ें