बुलढाणा न्यूज

गटविकास अधिकार्‍यांना धक्काबुक्की, तक्रारीवरुन सहा जणाविरुध्द गुन्हा दाखल

बुलढाणा न्यूज

                   संग्रामपूर (बुलढाणा न्यूज)- संग्रामपूर पंचायत समितीसमोर काकनवाडा येथील नागरिकांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी दबाव आणत 6 जणांनी गटविकास अधिकारी श्री.माधव पायघन यांना त्यांच्या कक्षात धक्काबुक्की केली असून सरकारी कामात अडथळा आणला या तक्रारीवरुन तामगाव पोलिसांनी विविध कलमान्वये 6 जणा विरुध्द गुन्हे दाखल केले आहे.
                गटविकास अधिकारी श्री.माधव पायघन हे त्यांच्या कक्षात असतांना उपोणकर्त्यांच्या मागण्या ताबडतोब पुर्ण करण्याकरिता गटविकास अधिकारी श्री.माधव पायघन यांना धमकावण्यात आले तसेच त्यांना खुर्चीवरुन ढकलण्यात आले अशी तक्रार गटविकास अधिकारी श्री.माधव पायघन यांनी तामगाव पोलिसात दिली. या तक्रारीवरुन तामगाव पोलिसांनी बुधवार, दि.4 ऑक्टोंंबर रोजी रात्री उशिरा नरेश तायडे, पुरुषोत्तम अढाव, पुंडलिक खानझोड, अमोल रावणकार, जितेंद्र बांगर, दत्तात्रय अढाव यांच्याविरुध्द पोलिसांनी विविध कलामान्वये गुन्हे दाखल केले असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सोळंके हे करित आहेत.

पिंपळगाव सराई-सैलानी रस्त्यावर अपघात, मोटार सायकल चालक ठार तर पत्नी जखमी

भारताला मिळालेलं कणखर नेतृत्व – लाल बहादुर शास्त्री

सेवाभावी दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील यंत्रणांनी कार्य करावे

Leave a Comment

और पढ़ें