best news portal development company in india

buldhananew स्त्रीभूषण रमाई पुरस्काराने भादोल्याचे शाहीर मल्हारी गवई सन्मानित

SHARE:

buldhananew बुलढाणा न्यूज : स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्था, नागपूर यांचेमार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा स्वीकारून आणि स्त्रीभूषण रमाई आंबेडकरांच्या जीवन कार्याचा आदर्श घेत सामाजिक बांधिलकीतून नियमीत सेवेत कार्यरत असणार्‍या बुलढाणा जिल्हयातील भादोला येथील कवी गायक व शाहीर मल्हारी पुंजाजी गवई यांना स्त्रीभूषण रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मल्हारी गवई यांनी समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी, सामाजिक जनजागृती, शैक्षणिक प्रोत्साहन तसेच सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी केलेल्या उल्लेखनिय व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन पुरस्कार समितीने त्यांची एकमताने निवड केली आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार भदन्त नागदिपंकर महास्थविर, सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्मारक समिती, दिक्षाभूमी नागपूर, महेंद्र मडामे, संरक्षक, करूणागिरी कलपाथरी समिती, रायपुर (छ.गड), गौतम मोरे, अध्यक्ष, बहुजन धम्म मिशन मुंबई हे कार्यक्रमाचे आयोजक तथा पदाधिकारी होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आले.

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें