बुलढाणा जिल्ह्यातील 73 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती तुमच्या गावाचा समावेश आहे का पहा?

10 टक्के गावे रँडम पद्धतीने निवड

See if your village is covered under drought-like conditions among the 73 revenue circles in Buldhana district?

        बुलढाणा न्यूज – खरीप हंगाम जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकाची स्थितीचा एकत्रित विचार करुन जिल्ह्यातील 73 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती तर बुलडाणा आणि लोणार तालुक्यातील 19 गावांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

             या तालुक्यामधील 10 टक्के गावे रँडम पद्धतीने निवडून शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आली आहे. त्यानुसार दुष्काळ परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. खरीप हंगाम दुष्काळाचे मूल्यांकन केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा व लोणार तालुक्यातील 19 गावामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये साखळी बु., गोंधनखेड, चांडोळ, उमरखेड, हतेडी बु., बोरखेड, गिरडा,मासरुळ,पांगरखेड,जांभरुण तसेच लोणार तालुक्यातील भिवापूर, धाड, गुंजापूर, कासारी, कौलखेड, खंडाळा, खापरखेड, राजनी, अंजनी खुर्द यांचा समावेश आहे.

         तर चिखली तालुक्यातील अमडापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा, खु. धोडप, पेठ, शेलगाव आटोळ, चांदई, चिखली, हातणी. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव राजा, देऊळगाव मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा, मेहकर तालुक्यातील मेहकर, जानेफळ, हिवराआश्रम, डोणगाव, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी गवळी, अंजनी बु. नायगाव दत्तापूर, सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सोनोशी, शेंदुरजन, साखरखेर्डा यांचा दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये समावेश आहे.

           मलकापूर तालुक्यातील जांभुळ धाबा, दाताळा, धरणगाव, मोताळा तालुक्यातील मोताळा, बोराखेडी, धामणगाव बढे, पिंप्री गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव देवी, शेलापूर बु., नांदुरा तालुक्यातील नांदुरा, वडनेर, शेंबा, निमगाव, चांदुरबिस्वा, महाळुंगी, खामगाव तालुक्यातील खामगाव, पिंपळगाव राजा, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव, आवार, अटाळी, पळशी बु. आडगाव, वझर, पारखेड तसेच शेगाव तालुक्यातील माटरगाव, जलंब, जवळा बु., मानसगाव, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, पिंपळगाव काळे, वडशिंगी, आसलगाव, जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, पातुर्डा आणि कवठळ या गावांचा दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले आहे.

शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?

बालीकेवर अत्याचार करणार्‍या नराधमास पोलीसांनी पकडले

 

अरे बापरे नातेवाईकांनी मृतदेह ठेवला शहर पोलीस स्टेशनला

लग्नाचे आमिष देत विवाहितेवर वारंवार अत्याचार

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें