The police caught the who tortured the girl
कोणाला सांगू नको नाही तर तुला जीवाने मारून टाकीन आरोपीने दिली होती पिडीतेस धमकी
बुलढाणा न्यूज – सहा वर्षीय अल्पवयीन पिडीता ही घरातून बाहेर खेळण्याकरीता गेली असता नराधमाने अल्पवयीन मुलीस खाऊचे आमिष दाखवत घरात बोलावित चिमुकलीवर अत्याचार केल्याची कलंकीत करणारी घटना रविवार, दि.19 नोव्हेेंबर रोजी दुपारचे सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द या गावात घडली होती. या प्रकरणी मुलीच्या आईचे तक्रारीवरुन पोलीसांनी नराधमाविरुध्द गुन्हा दाखल केला होता. परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता. सदर आरोपीस मंगळवार, दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वेस्थानकावरुन यशस्वी सापळा रचून पोलीसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे.
आरोपीने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून तिला घरी नेऊन तिचेशी जबरी संभोग केला व तिला चॉकलेटसाठी पाच रुपये देऊन कोणाला सांगू नको नाही तर तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी विठ्ठल समाधान दामोधर वय 50 रा.खेर्डा खुर्द याने पिडीतेस दिली होती. यानंतर आरोपी गावातुन फरार झाला होता. प्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक पी.आर.इंगळे यांनी आरोपीचा आजूबाजूच्या परीसरात शोध घेतला परंतु मिळुन आला नाही. यानंतर गोपनिय माहीतीच्या आधारे आरोपी अकोला येथील वसंत देसाई स्टेडियम येथे असल्याचे समजले. यावरून सहाय्यक पोलीस निरिक्षक इंगळे यांनी स्थानिक पोलीसांकडून मदत घेऊन
आरोपी विठ्ठल समाधान दामोधर रा.खेर्डा खुर्द यांची शोधमोहीम सुरू केली व जळगाव जामोद येथून पोलीसांची चमू शोध मोहिमेस रवाना केली.
या दरम्यान आरोपी मोबाईल चालू बंद करीत वेळोवेळी लोकेशन बदल करीत पोलीसांची दिशाभूल करीत होता. तरी देखील पोलीसांनी अकोला मधील परिसरात आरोपीच्या शोधात पिंजून काढला परंतू आरोपी हा मुंबईकडे रवाना झाला होता.
यावेळी पोलीस उपनिरिक्षक सरकटे, उमेश शेगोकार, पोकॉ. सागर तांदळे यांना मुंबईकडे रवाना करून आरोपीचे मुंबईकडील नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. परंतु आरोपी मुंबईच्या नातेवाईककडे गेला होता पण जास्त वेळ थांबला नाही. त्यामूळे आरोपी मुंबईत मिळून आला नाही. आरोपीने मुंबईवरून पुणे गाठले व त्यानंतर पुणेवरून भुसावळकडे येत असतांना रेल्वेमधील प्रवाशांच्या मोबाईलवरून एका नातेवाईकाशी संपर्क साधला. त्यावरुन सिडिआर व एसडीआर वरून माहिती घेऊन सहाय्यक पोलीस निरिक्षक इंगळे, नापोका ईरफान शेख, पोका प्रेम पवार यांनी भुसावळ रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून आरोपी विठ्ठल समाधान दामोधर रा.खेर्डा खुर्द यास ताब्यात घेतले.
यांनी पकडले त्या नराधमास
अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, एसडिपिओ देवराम गवळी,पोलीस निरिक्षक दिनेश झांबरे, पोलीस निरिक्षक बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक पि.आर.इंगळे, पोउपनि नारायण सरकटे, पोकाँ प्रेम पवार, पोहवा उमेश शेगोकार, नापोका इरफान शेख, पोका सचिन राजपुत, पोकॉ सागर तांदळे, पोकाँ प्रफुल्ल डब्बे यांनी केली.
सोयंदेव येथे मनोज जरांगे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
One Response