खामगाव – शहरातील गोपाळनगर येथून 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या चार वर्षांच्या मुलीसह आणि 12 महिन्यांच्या चिमुकल्या मुलासह अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली नरेंद्र मुळे (वय 23) या 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मुलगी शीवन्या (4) आणि मुलगा शीवांश (12 महिने) यांना ‘कटिंग करून आणते’ असे सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. शोध घेऊनही काहीच पत्ता न लागल्याने, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी बेपत्ता महिलेच्या आई रेखा गजानन कापडे (50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वसत्कार करत आहेत.


