बुलढाणा न्यूज

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे भोवले जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केले पोलीस अंमलदारास निलंबित

बुलढाणा न्यूज

बुलढाणा न्यूज Buldhana
दि.4 फेब्रुवारी 2024 रोजी मोटार परीवहन विभाग, बुलढाणा पोलीस येथे कार्यरत असलेले तसेच खामगांव येथील नियंत्रण कक्ष येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार स. फौ. गजानन खेडे यांनी मोटार परीवहन विभाग या व्हॉटस अप गृपवर आक्षेपार्ह मजकुर असलेली पोस्ट केली होती. स.फौ.गजानन खेर्ड हे पोलीस दलामध्ये जबाबदार पदावर कार्यरत असुन त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कर्तव्य प्राधान्याने करावे लागते, याची माहीती असुन सुध्दा एका लोकसेवकानेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकुर व्हॉटसअप गृपवर टाकला. त्यांचे हे कृत्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा सुनिल कडासने यांना याची माहिती मिळताच या प्रकरणात नियंत्रण कक्ष खामगाव येथील अधिकार्‍यांकडुन तात्काळ अहवाल मागविला व पोलीस अंमलदाराने केलेल्या कृत्याकरीता सोमवार, दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी सेवेतुन निलंबीत केले. त्यांच्या कृत्याच्या प्राथमिक चौकशीचे आदेश पोलीस निरीक्षक, बुलढाणा शहर यांना देण्यात आलेले आहे.

पोलीस दल हे कायदा राबवणारी यंत्रणा

जिल्हयात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे. शांतता राहावी या करीता पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य पार पाडावे. आपल्या कर्तव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मीक भावना दुखावतील असे कर्तव्य न करण्याचे सुचना पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना सोमवार, दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस मुख्यालय येथे आयोजीत गुन्हे आढावा बैठकी दरम्यान दिल्या.

धार्मीक भावनांचा आदर करा

जिल्हा पोलीस दल हे जिल्हातील सर्व धर्मीय नागरीकांच्या धार्मीक भावनांचा आदर करते. व नागरीकांना देखील आवाहन करते की, कोणीही कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे बेकायदेशीर कृत्य करु नये, असे कृत्य कायद्यानुसार गुन्हयाच्या कक्षेत येतात, याबाबत पोलीस विभाग कायदेशीर कारवाई करेल.
– सुनिल कडासने, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा.

Leave a Comment

और पढ़ें