बुलढाणा न्यूज

आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कृती समितीने महाराष्ट्रभर बेमुदत संप

Asha-workers-strike-buldhana

The action committee of Asha and group promoters organized an indefinite strike across Maharashtra

राज्यातील 70 हजार आशा वर्कर व साडेतीन हजार गटप्रवर्तक संपात सहभागी

70 thousand Asha workers and three and a half thousand group promoters participated in the strike

 

         बुलढाणा न्यूज www.buldhananews.com –  आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कृती समितीने महाराष्ट्र भर कृती समितीच्या वतीने बुधवार, दि.18 ऑक्टोबर 2023 पासून आपल्या न्याय मागण्यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. राज्यातील 70 हजार आशा वर्कर व साडे तीन हजार गटप्रवर्तक या संपात सहभागी झालेल्या आहेत.

       या संपाला प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यातील 2 हजार आशा वर्कर व 100 गट प्रवर्तकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. गट प्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचार्‍याप्रमाणे सुसूत्रीकरण करून त्यांचे  सेवेत समायोजन करावे. ऑनलाइन कामाची जी शक्ती मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर करण्यात येत आहे ती तात्काळ बंद करावी. गेला पाच वर्षापासून केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात एक रुपयाची सुद्धा वाढ केलेली नाही. आशा वर्कर यांना 21 हजार रूपये व गटप्रवर्तकांना 26 हजार रुपये किमान वेतन तसेच दिवाळी भेट  म्हणून 5 हजार रुपये बोनस  देण्यात यावे.यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात  आलेला आहे.

Asha-workers-strike-buldhana

       त्यांच्या प्रश्नांची  सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सोडवणूक करावी यासाठी बुधवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यात पंचायत समिती कार्यालय आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात एक दिवशीय धरणे देऊन निदर्शने करण्यात आली.

यावेळी सहभागी असलेल्या आशा व गटप्रवर्तकांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्य विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत सरकार आशा व गटप्रवर्तक यांच्या  मागण्या मंजूर करीत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरू असलेले हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार या आंदोलना बाबत प्रचंड उदासीन असून कुठल्याही प्रकारची गंभीरपणे दखल घेताना दिसत नाही. उलट वेगवेगळ्या प्रकारची धमकी वजा पत्र देऊन हा  संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु या धमक्यांना भीक न घालता राज्यातील आशा व गटप्रवर्तक ह्या आपल्या संपावर ठाम असून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी या आंदोलनाच्या निमित्ताने केला आहे.

         बुलढाणा जिल्ह्यातील आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड हे करित असून सोबतच राज्य सचिव ललिता बोदडे, जयश्रीताई तायडे, जिल्हा सचिव सुरेखा पवार, उपाध्यक्ष रश्मीताई दुबे, स्वाती वायाळ, वर्षा शेळके, मंदा मसाळ, सीमा उमाळे, अन्नपूर्णा कुकडे, अलका राजपूत प्रतिभा लहाने, ज्योती डूकरे, प्रज्ञा बोर्डे, सविता म्हस्के, गंगा अंभोरे, सीमा सोळंके, संगीता लोखंडे, प्रतिभा बांणाईत, शालीनी डवले, मिरा दांडगे,सीमा शेळके,शारदा लिंगायत,कविता चव्हाण,विजया ठाकरे,रेखा इंगळे, संगिता बोराडे गवळी, सुनिता शिराळे,सविता निमकर्डे इत्यादी सह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक पुढाकार घेऊन हे आंदोलन यशस्वी करिता आहेत.

 

या आहेत मागण्या

ऑनलाइन कामाची जी शक्ती मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर करण्यात येत आहे ती तात्काळ बंद करावी. गेला पाच वर्षापासून केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात एक रुपयाची सुद्धा वाढ केलेली नाही. आशा वर्कर यांना 21 हजार रूपये व गटप्रवर्तकांना 26 हजार रुपये किमान वेतन तसेच दिवाळी भेट  म्हणून 5 हजार रुपये बोनस  देण्यात यावे.यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यासाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे.

शेतकरी बांधवांनो तुम्हाला शेतमाल तारण कर्ज योजना माहिती आहे का?

Leave a Comment

और पढ़ें