Zilla Parishad, Buldhana
बुलढाणा न्यूज- समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा Zilla Parishad, Buldana 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत सन 2023-24 या वित्तिय वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्याकरिता मिनी पिठाची गिरणी Mini flour mill for disabled beneficiaries पुरविण्याची योजना घेण्यात आलेली आहे. सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना परीपुर्ण अर्ज अनुषंगिक सर्व कागदपत्रासह संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयाकडे दिनांक 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. सदर योजनेच्या अर्ज करण्याकरीता बुधवार, दि. 25 ऑक्टोबर 2023 मुदतवाढ देण्यात येत आहे. योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, भाग्यश्री विसपूते, जिल्हा परिषद, बुलढाणा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, मनोज मेरत, जि.प.बुलढाणा यांनी केलेले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे शुक्रवारी बुलढाणा जिल्हयात