असा आहे रुपाली चाकणकर यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीस उपस्थित राहतील

          बुलढाणा न्यूज – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दि. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान त्या जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतील. शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या जनसुनावणीस उपस्थित राहतील.
         दौर्‍यानुसार श्रीमती चाकणकर यांचे गुरूवार, दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होऊन मुक्काम करतील. शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेईल.
तसेच सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. शनिवार, दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळाला भेट देतील.

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी Caste Certificate Verificationअर्ज करावेत

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे शुक्रवारी बुलढाणा जिल्हयात

महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात – रुपाली चाकणकर Rupali Chakankar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें