best news portal development company in india

अंडाभुर्जी न दिल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाला मारहाण; हॉटेलची तोडफोड

SHARE:

खामगाव : हॉटेल बंद असताना अंडाभुर्जी देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला करून हॉटेलची तोडफोड करण्यात आल्याची घटना १४ जुलै रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता टेंभुर्णा शिवारातील हॉटेल अलबेला येथे घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी एका नामजद आरोपीसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नरहरी ठोसर (वय ३२, रा. हिरानगर, खामगाव) यांचे टेंभुर्णा फाट्याजवळ हॉटेल अलबेला आहे. १४ जुलैच्या रात्री हॉटेल बंद करण्याची तयारी सुरू असताना महादेव राजाराम बोदडे (रा. हिंगणा कारेगाव) हा हॉटेलवर आला आणि अंडाभुर्जीची मागणी केली. मात्र, स्वयंपाकी उपलब्ध नसल्याने तसेच हॉटेल बंद झाल्याचे विजय ठोसर यांनी त्याला सांगितले.

यावरून महादेव बोदडे काही वेळासाठी निघून गेला. मात्र, थोड्याच वेळात तो दोन अनोळखी साथीदारांसह पुन्हा हॉटेलवर आला. अंडाभुर्जी का दिली नाही, या कारणावरून तिघांनी विजय ठोसर यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर जड वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून नुकसान केले.

विजय ठोसर यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी महादेव राजाराम बोदडे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३२४(४), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें