best news portal development company in india

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांचा केंद्रीय राज्यमंत्र्यांना सवाल

SHARE:

३१ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब द्या : काँग्रेस नेते शैलेश सावजी यांची मागणी

मेहकर परिसरातील ज्वलंत समस्य ह्या आहेत

डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक दिवसांपासून का बंद आहे? शेलगाव देशमुख येथील नळ योजना बंद अवस्थेत का पडली आहे? शेलगाव देशमुख येथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या दवाखान्याचे बांधकाम चार वर्षांपूर्वी पूर्ण होऊनही तो आजपर्यंत सुरू का करण्यात आला नाही? ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षणाच्या मूलभूत सुविधा अद्यापही अपुर्‍या का आहेत? अनेक गावांतील अंतर्गत रस्ते, गटारे, स्मशानभूमी, समाजमंदिरे व सार्वजनिक सुविधा वर्षांनुवर्षे प्रलंबित का आहेत? स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या परिसरात कोणते ठोस उद्योग आणले गेले? शेतकर्‍यांसाठी सिंचन, पाणी साठवणूक व शेतीपूरक प्रकल्प किती प्रमाणात राबविण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

बुलढाणा – केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या प्रदीर्घ ३१ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या विकासकामांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा जनतेसमोर जाहीर करावा, अशी थेट आणि आग्रही मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

लोकशाहीत जनताच अंतिम मालक असल्याने लोकप्रतिनिधींनी आपल्या कामांचा हिशोब देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे, असे शैलेश सावजी यांनी म्हटले आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल खासदार जाधव यांचे अभिनंदन करत शैलेश सावजी यांनी डोणगाव जिल्हा परिषद सर्कल आणि परिसरातील प्रलंबित विकासकामांवरून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी १९९५ पासून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि त्यानंतर बुलडाणा लोकसभेचे खासदार म्हणून सातत्याने प्रतिनिधित्व केले आहे. या ३१ वर्षांच्या काळात आमदार आणि खासदार निधीतून डोंणगाव सर्कलमध्ये नेमकी कोणती कामे मंजूर झाली, किती पूर्ण झाली आणि किती निधी खर्च झाला, याचा जाहीर ताळेबंद त्यांनी मांडावा, असे आव्हान या पत्रातून देण्यात आले आहे. शैलेश सावजी यांनी पत्रात डोंणगाव आणि मेहकर परिसरातील १० ज्वलंत समस्यांवरून जाहीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक दिवसांपासून का बंद आहे? शेलगाव देशमुख येथील नळ योजना बंद अवस्थेत का पडली आहे? शेलगाव देशमुख येथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या दवाखान्याचे बांधकाम चार वर्षांपूर्वी पूर्ण होऊनही तो आजपर्यंत सुरू का करण्यात आला नाही? ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षणाच्या मूलभूत सुविधा अद्यापही अपुर्‍या का आहेत? अनेक गावांतील अंतर्गत रस्ते, गटारे, स्मशानभूमी, समाजमंदिरे व सार्वजनिक सुविधा वर्षांनुवर्षे प्रलंबित का आहेत? स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या परिसरात कोणते ठोस उद्योग आणले गेले? शेतकर्‍यांसाठी सिंचन, पाणी साठवणूक व शेतीपूरक प्रकल्प किती प्रमाणात राबविण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सन १९९५ ते २०२६ या संपूर्ण कालखंडातील आमदार निधी, खासदार निधी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून झालेल्या सर्व विकासकामांचा सविस्तर आणि पारदर्शक लेखाजोखा जाहीर करावा, शैलेश सावजींच्या जाहीर पत्रामुळे आणि उपस्थित केलेल्या थेट प्रश्नांमुळे आता बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आणि डोणगाव-मेहकर परिसरात या विकासकामांच्या हिशोबावरून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री यावर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें