best news portal development company in india

बुलढाणा जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पत्रकार नदीम शेख सन्मानित

SHARE:

जागतिक रक्तदान दिनी त्यांच्या कार्याचा गौरव

बुलढाणा/ प्रतिनिधी

 जबाबदारी वाढवणार
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेले हे सन्मानपत्र आम्हाला भविष्यात आणखी जोमाने सामाजिक कार्य करण्यासाठी, तसेच जास्तीत जास्त गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करेल.
– नदीम शेख
अध्यक्ष, अल मदीना फाउंडेशन, बुलढाणा.

संकटकाळात रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी फाउंडेशनचे कार्यकर्ते सातत्याने कार्यरत असतात. या सामाजिक बांधिलकीची दखल घेत शासकीय रक्तपेढी (ब्लड बँक) आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जागतिक रक्तदान दिनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार्‍या अल मदीना फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत, जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष नदीम शेख यांना सन्मानित करण्यात आले. जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून सोमवार, १५ जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार यांच्या हस्ते नदीम शेख यांना सन्मानपत्र देऊन हा गौरव करण्यात आला.

अल मदीना फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजात निस्वार्थ भावनेने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. यामध्ये विशेषतः गरजू रुग्णांसाठी नियमित रक्तदान करणे आणि ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करणे यासारख्या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार सर आणि शासकीय ब्लड बँकेच्या इतर प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत नदीम शेख यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या पुरस्काराबद्दल अल मदीना फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

नाली बांधकामाचे बिल मंजूरीसाठी ४.५ लाख रुपयांची लाच

माजी मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

 

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें