best news portal development company in india

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता दुधाचे भावही गगनाला

SHARE:

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेल असो किंवा अगदी पावच्या वस्तूंचे भाव जवळपास दररोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे की, दुधाचे भावही गगनाला भिडू लागले आहेत. महागाईने आता हद्द पार केली आहे. बराच मोठा उच्चांक गाठला असून, सामान्य जनता तिच्या तीव्र झळांनी हैराण झाली आहे. दुधाच्या दरात वाढ झाली आहे. केवळ दूधच नव्हे, तर दही आणि पनीरसारखे इतर दुग्धजन्य पदार्थही आता अधिक महाग मिळणार आहेत. सुधा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती नेमक्या किती वाढल्या आहेत, नेमक्या कोणत्या राज्यात ही वाढ झाली आहे .


भारताता महागाई जोर धरत असताना बिहार राज्यातील सुधा दुधाच्या किमतीत बरीच वाढ झाली आहे. फक्त दुधच नाही तर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. बिहारमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर २ ते ३.३० ची वाढ करण्यात आली आहे. नेमक्या किती वाढल्या किमती ? आणि त्याचा इतर राज्यांवरहीपरिणाम होऊ शकतो का ? दुधाच्या किमतींमधील वाढीचा सामान्य माणसाच्या बजेटवर मोठा परिणाम होतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, दुधाव्यतिरिक्त सुधा च्या इतर उत्पादनांच्या ज्यामध्ये पनीर, पेढा, लोणी, गुलाबजाम आणि रसगुल्ला यांचा समावेश आहे. त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत.

प्रति लिटर २ पर्यंत वाढ
या वस्तूंची अधिकृत दरसूची अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सुधाच्या आधी, अमूल डेअरी नेही आपल्या दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. अमूलने आपल्या दुग्धजन्य उत्पादनांपैकी काहींच्या किमती प्रति लिटर २ पर्यंत वाढवल्या. अमूल गोल्ड, स्टँडर्ड मिल्क, टी स्पेशल , गायीचे दूध आणि म्हशीचे दूध या प्रकारांमध्ये ही दरवाढ लागू करण्यात आली.

पेपर खरेदी करणार्‍या पालकांची यादी सीबीआयकडे तयार?

आमदार श्वेता महाले यांना मनोज लाहूडकरचे आवाहन

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें