best news portal development company in india

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा सात दिवस होणार साजरा

SHARE:

गुरूवारला सामुहिक पारायण सोहळा

श्री क्षेत्र खेर्डी (डोंगर खंडाळा) – खेर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव दि. १५ मार्च ते २१ मार्च २०२६ या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
उत्सवानिमित्त दररोज सकाळी व सायंकाळी पूजा-अर्चा, आरती व भजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १५,१६ १७ मार्च रोजी गणेशयाग होणार असून, बुधवार, दि. १८ मार्च रोजी दुपारी ४ वा श्री सोमनाथ भजनी मंडळ, डोंगरशेवली यांचे भजन तर संध्याकाळी गोविंददास भजनी मंडळ, डोंगरखंडाळा यांचे भजनाचा कार्यक्रम होईल.

गुरूवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सामुहिक पारायण सोहळा, भागवत धर्म प्रसारक मंडळ बुलडाणा यांचे भजनाचे दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ८ वाजता श्री स्वामी समर्थ साराअमृत भजन व कामेश्वर भजनी मंडळ,खुपगांव प्रवचन, तर दि. २० मार्च शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजता लघुरुद्र अभिषेक, भागवताचार्य हभप श्री राम महाराज गाडेकर,शेलुद व सिध्देश्वर मंदिर डोंगर खंडाळा येथुन पालखी दुपारी ४ वाजता निघणार आहे. शनिवार,दि.२१ मार्च २०२६ रोजी श्री हभप प्रा डॉ अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, सावरगाव माळ यांचा किर्तनाचा कार्यक्रम सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत राहणार आहे, तर त्यानंतर
दुपारी १ वाजल्यापासुन ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भाविकांना आध्यात्मिक लाभ घेता येणार आहे.

या कार्यक्रमांना परिसरातील तसेच बाहेरील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त दलाल परिवार, बुलडाणा अर्बन परिवार, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व श्री संत गजानन महाराज सेवाधारी मंडळ, किन्होळा, खेर्डी, सव, डोंगर खंडाळा,पाडळी, डोंगर शेवली,रुईखेड, खुपगांव, वरवंड व आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

best news portal development company in india
और देखें