Tree plantation on behalf of Buldana Urban Branch Masrul
मासरुळ : बुलडाणा अर्बन मासरुळ शाखेच्या वतीने शुक्रवार, दिनांक 5 जुन 2024 रोजी संस्थेच्या शाखा मासरूळ येथे बुलडाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी , संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर तसेच सहकार विद्या मंदिर अध्यक्षा सौकोमलताई सुकेश झंवर यांच्या संकल्पनेतून बुलडाणा ग्रामीण -2 चे विभागीय व्यवस्थापक श्री.सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली भाईजी यांच्या विचारानुसार प्रदूषण वाढ खूप जास्त प्रमाणात होत आहे.
त्यामुळे वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे त्या माध्यमातून शाखा मासरूळच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.याप्रसंगी चिंच, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, इतर वृक्ष शेतकर्यांना शेतामध्ये लावण्यासाठी संस्थेच्या वतीने देण्यात आले.
त्यावेळी शाखा मासरूळचे स्थानिक संचालक शंकरराव सिनकर, जगनदादा उंबरकर, भागाजी कापरे, माजी सरपंच साहेबराव पवार, अशोक पाटील, दैनिक देशोन्नती पत्रकार संजय देशमुख, अंकुश देशमुख, एकनाथ आल्हाट, देविदास कोथळकर व शाखा व्यवस्थापक विश्वनाथ पिंपळे, शाखेतील सर्व कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी गजानन सिनकर याप्रसंगी उपस्थित होते.