रुईखेड मायंबा येथे 750 घरांना कचराकुंडी वाटप (Distribution of garbage bins to 750 households at Ruikhed Mayamba)
सरपंचपती अनिलभाऊ फेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कचराकुंडीचे वाटप
रुईखेड मायंबा : बुलढाणा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत रुईखेड मायंबा येथे रविवार, दि.30 जून रोजी रुईखेड मायंबा गावचे सरपंचपती अनिलभाऊ फेपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त घरोघरी कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. यावेळी रुईखेड मायंबा गावात जवळपास 750 घरांना कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांना कचरा कुंडीचे वाटप करण्याचा हेतू असा की, रुईखेड मायंबा ग्रामस्थांनी कचरा रस्त्यावर व गावाच्याकडेला फेकू नये, जेणे करून पावसाळ्यात होणार्या रोगाचा प्रसार होणार नाही. याकरिता घरासमोर कचराकुंडी ठेवावी व तीन दिवसांनी गाडी येऊन कचरा घेऊन जाईल. गावातील तसेच मोहोज येथील गावकर्यांना सुद्धा काही दिवसात कारचरा कुंडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रुईखेड मायंबा वाटप प्रसंगी रुईखेड मायंबा येथील महिलांचा बहुसंख्येने सहभाग दिसून आला. कचरा कुंडी वाटप कार्यक्रम प्रसंगी गावचे ग्रामसेवक इंगळे, सरपंचपती अनिलभाऊ फेपाळे, ग्रामपंचायत सदस्य, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आवटी त्यांच्या सह शिक्षक वृंद व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.