नारी सन्मान महिला मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथेची सांगता

Conclusion of Shri Shiv Mahapuran story conducted on behalf of Nari Samman Mahila Mandal

गणेश ढाकणे 8888435869

      बीड – गेवराई शहरातील माऊली नगर येथील नारी सन्मान महिला मंडळाच्या वतीने प्रथमच शिवभक्ती भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे सेंट झेवियर्स शाळा गेट नंबर 2 माऊली नगर या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. सोमवार दि.27 नोव्हेंबर 2023 पासून या कथेचा प्रारंभ झाला होता. या कथेची सांगता रविवार, दि.3 डिसेंबर 2023 झाली. प.पु.डॉ. अशिषानंद महाराज धारूरकर यांच्या अमृततुल्य वाणीतून शिव महापुराण कथेचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेतला.

       शिवपुराण कथा प.पु.डॉ.अशिषानंद महाराज धारूरकर यांच्या अमृततुल्य वाणीतून गेवराई शहरवासीयांना ऐकायला मिळाली. कथेच्या सांगते निमित्त अकरा हजार रुद्राक्ष वाटप करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला. शिव महापुराण कथे करिता नारीसन्मान महिला मंडळाचे सर्वच सदस्य, माऊली नगर गेवराई यांच्यासह शैला मुंडे, शितल दाभाडे, शामल ढाकणे, वैशाली महामुनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यांनी दिली सढळ हाताने देणगी

नारी सन्मान देणगी म्हणून सौ.शैला मुंढे, सौ.वैशाली महामुनी, सौ.शामल ढाकणे, सौ.कुसुम मोरे, सौ.सुनिता आघाव , सौ.अवधूत , सौ.गाडेकर, सौ.उगलमुगले , डॉ.सौ.मनीषा ढाकणे, डॉ.सौ.अंजली हुसे, सौ.लताबाई ढाकणे, सौ.रोहिणी महामुनी, सौ.संध्या दीक्षित, सौ.अर्चना येवले, सौ.निर्मला आव्हाड, सौ.सोनाली मिटकरी, सौ.कलिंदा आतकरे, सौ.छाया पंडित, सौ.प्रगती ढाकणे, सौ. प्रणिता सांगळे, सौ.शीतल दाभाडे, सौ.वर्षा शेलार, सौ वर्षा दिक्षित, सौ. शामला ढाकणे, ज्योती मिसाळ , गीता भाभी, सौ.भारती कोकाट , सौ. जयश्री कृष्णा पंडित, सौ.मुक्ता महमुणी या महिलांनी आर्थिक सहाय्य केले.

Buldhana Today News – देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे आरोपी पुणे, अकोला, बुलढाणा जिल्हयातील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें