बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भगवानराव काळे

          बुलढाणा न्यूज – बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) गटाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी भगवानराव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड आज रविवार, दि.3 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर यांनी राष्ट्रवादी कार्यालय बुलढाणा येथे एका पत्रकाद्वारे केली आहे.

बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी भगवानराव काळे

          चिखली तालुक्यातील वाडी- ब्रह्मपुरी सारख्या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले भगवानराव काळे हे राष्ट्रवादीच्या पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी सोबत आहेत. चिखली तालुका लेवलवर त्यांनी विविध पदावर कार्य केले असून 2012 ते 2016 पर्यंत चिखली तालुका अध्यक्षपद देखील चांगल्या रितीने सांभाळले आहे. यानंतर सन 2016 ते आजपर्यंत ते जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होते. आज रविवार, दि.3 डिसेंबर 2023 रोजी भगवानराव काळे यांची शरद पवार गटाकडून जिल्हा उपाध्यक्षपदी निवड चिखलीच्या माजी आमदार तथा राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा सौ.रेखाताई खेडेकर यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती केली आहे.

            याप्रसंगी निवडी प्रसंगी जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव सरदार, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, कार्याध्यक्ष नरेश शेळके, दुसरे कार्याध्यक्ष प्रसन्नजित पाटील यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

Buldhana Today News – देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे आरोपी पुणे, अकोला, बुलढाणा जिल्हयातील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें