बुलढाणा न्यूज – भारत विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुलढाणा येथील मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडु गायकवाड यांची नियमबाह्य व बेकायदेशीर पध्दतीने मुख्याध्यापक पदावर नियुक्ती केलेली आहे. ती रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते विनोद मधुकर बोरकर हे आमरण उपोषणास बसलेले आहे.
भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुलढाणा येथे विद्यार्थी विनय बोरकर यांचे अकरावी जनरल सायन्सच्या अॅडमिशनसाठी मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडु गायकवाड यांनी पालक विनोद मधुकर बोरकर यांना मुलांच्या अकरावी च्या अॅडमिशनसाठी पंधरा हजार रुपयेची नियमबाह्य पध्दतीने लाचेची मागणी केली होती.
त्याअनुषंगाने तक्रारदार विनोद बोरकर यांनी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून मुख्याध्यापक गायकवाड यांना लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानुसार पोलिस स्टेशन बुलढाणा शहर येथे दि.3 ऑगस्ट 2022 रोजी भारत विद्यालय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बुलढाणा येथील मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता मुख्याध्यापक गायकवाड यांना दोन दिवसांचा मॅजेस्टेट कस्टडी दिली होती व तपास अधिकारी यांच्याकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
शिक्षण अधिकारी माध्यमिक बुलढाणा यांनी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने निलंबित केले होते असे असताना भारत विद्यालय बुलढाणा येथील अध्यक्ष डॉ. सिमा हर्षवर्धन आगाशे यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर पध्दतीने संस्थेचा ठराव घेऊन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडु गायकवाड यांची परत मुख्याध्यापक पदावर नियुक्ती होण्यासाठी प्रस्ताव सादर केला.
त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा प्रकाश मुकुंद यांनी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असताना व गुन्ह्याचा तपास चालू असताना नियमबाह्य बेकायदेशीर पध्दतीने मुख्याध्यापक यांना त्याच पदावर नियुक्तीचे आदेश दिले आहे. त्याविरुध्द सामाजिक कार्यकर्ते विनोद बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे 10 नोव्हेंबर रोजी आमरण उपोषणासाठी निवेदन दिले होते. दि.20 नोव्हेंबर पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
Buldhana Today News – देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे आरोपी पुणे, अकोला, बुलढाणा जिल्हयातील