बुलढाणा न्यूज- बुलढाणा शहराला लागून असलेल्या माळविहिर ग्रामंपचायत अंतर्गत चिखली रोडवरील वृंदावन नगर मधील बुद्ध विहार येथे संघटनेच्या वतीने रविवार, दि.26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन तसेच रेशन कार्ड शिबिर संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अतिश बिडकर होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश बिडकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन करून घटनेचे शिल्पकार तथा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष यांनी भारतीय संविधान निर्मितीत डॉ.बाबासाहेबांचे आंबेडकर यांचे योगदान, नागरिकांचे हक्क, कर्तव्य, जबाबदारी व संविधान दिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा
सौ.निशाताई पावडे तथा शाखा अध्यक्ष सौ.दीपाताई वायचोळ यांनी संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.निरंजन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव निंबाळकर, प्रभाकर जाधव, श्रीमती गोदावरी डोंगरदिवे, सौ.हिवाळे ताई, सौ.कमलाबाई जाधव, श्रीमती मोकळेताई, सौ.वंदनाताई तळोले ,श्रीमती वैशाली कोलते, श्रीमती आशा मापारी, उदयराजे सुरडकर, गजानन वाघ, विपिन डोंगरदिवे, स्वप्निल हिवाळे , सौ.माया खराटे, सौ.सिद्धि चन्दनपाट, भारत जाधव, मंगेश वायचोळ यांनी परिश्रम घेतले.
तसेच रेशन कार्ड शिबीरादरम्यान परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. तसेच 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Buldhana Today News – देशी कट्टयाची खरेदी-विक्री करणारे आरोपी पुणे, अकोला, बुलढाणा जिल्हयातील
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी बुलडाणा येथे कुक्कुट आणि पशुपालन प्रशिक्षण