नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.अतुल ढोक तर उपाध्यक्षपदी अतुल फुले

          बुलढाणा न्यूज – नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या., नागपूरच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बिन विरोध निवड करण्यात आली. ही निवड दि.20 नोव्हेंबर रोजी अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संचालक मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षाचा राहणार आहे.
               

        या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा अध्यासी अधिकारी मा. उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय, नागपूर श्री. बोदड , यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली.

          याप्रसंगी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांनी एक मताने सर्व सहमतीने संस्थेच्या पदाधिकार्‍यांची अध्यक्षपदी डॉ.अतुल परशुराम ढोक , उपाध्यक्षपदी श्री.अतुल रमण फुले, मानद सचिव डॉ. प्रज्ञेय एकनाथ ताकसांडे, खजिनदारपदी डॉ.राजेश प्रकाश लिमसे, संचालकपदी डॉ. किशोर शेषराव राठोड , डॉ. वैशाली वीरेंद्र बांठिया ,डॉ. उमेश माईंदे , डॉ. श्वेता रमेश लेंडे, श्री. दिलीप नाचणे , श्री. धनराज मेश्राम व श्री.अनिल कुमरे यांची एकमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सोयंदेव येथे मनोज जरांगे याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 9 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें