बेमुदत संपाला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा पाठिंबा
Support of Anganwadi Employees Union for indefinite strike
बुलढाणा न्यूज www.buldhananews.com– मोताळा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज शुक्रवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एकदिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. बुधवार, दिनांक 18ऑक्टोबर 2023 पासून राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे.
या संपाला बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेने संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील, राज्य कौन्सिल मेंबर मायाताई वाघ यांच्या सह बहुसंख्येने अंगणवाडी सेविकांनी आज मोताळा येथील त्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी जो पर्यंत आशा व गटप्रवर्तकांचा बेमुदत असलेला संप चालू राहिलं तोपर्यंत जिल्ह्यातील कुठल्याही अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आरोग्य विषयक कोणतीच कामे करणार नाही असा विश्वास संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील यांनी आंदोलनास संबोधित करताना उपस्थित आंदोलनातील आशा व गटप्रवर्तकांना दिला.
यावेळी आंदोलनकर्त्या सीमा शेळके, कविता चव्हाण, शारदा लिंगायत, अनूपमा जाधव, पुष्पा सुरडकर, छाया हिवाळे, शकुंतला श्रीनाथ,काकर मॅडम यांचेसह आशा व गटप्रवर्तकांनी बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेला धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. आंदोलनाच्या शेवटी मागण्यांचे निवेदन मोताळा तालुका गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांनी हृदयरोगतज्ञ डॉक्टराचेच ठोके वाढविले
आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या कृती समितीने महाराष्ट्रभर बेमुदत संप