साहित्यिक कवी तथा चित्रपट निर्माते डॉ.गोविंद गायकी यांचे प्रतिपादन
बुलढाणा न्यूज www.buldhananews.com – फुले-आंबेडकरी विचार घरोघरी पोहचविणारे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना प्रदान करण्यात आलेल्या मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर अर्थात डिलीट या अत्युच्च पदवीने डॉ.वामनदादा कर्डक यांचा आत्यंतिक सन्मान करणारी घोषणा नुकतीच जाहीर होताच दि. 21 ऑक्टोंबर 2023 रोजी बुलढाणा येथील हुतात्मा स्मारक परिसरात बहुजन साहित्य संघ, चिखलीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष डॉ.विजयकुमार कस्तुरे, अॅडव्होकेट तसेच ग्रामीण साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष कवी कडूबा बनसोडे, नागनगाव, ज्येष्ठ कवयित्री डॉ.मंजूताई राजे जाधव बुलढाणा, सुप्रसिद्ध योग शिक्षक-प्रशिक्षक व निसर्गोपचार तज्ञ डॉ. तृप्ती महाले-काटेकर, बुलढाणा, ज्येष्ठ कवी तथा संपादक रमेश खंडारे बुलढाणा, दलित साहित्य चळवळीतील क्रांतीकारी विचारांमुळे ड्रॅगन म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक मधू गवई बुलढाणा, ज्येष्ठ कवी भाऊ भिसे, बुलढाणा तथा वामनदादांचे अनुयायी कार्यकर्ते चिंतामण जाधव यांच्या वतीने आयोजित, डॉ.वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेच्या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने आपले भाष्य करताना महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिक कवी तथा चित्रपट निर्माते डॉ.गोविंद गायकी यांनी उदगार काढले.
महाराष्ट्राच नव्हे तर देशभर आपल्या उर्दू शायरीची छाप पाडणारे तथा कुशल शल्य चिकित्सक धन्वंतरी डॉ. गणेश गायकवाड बुलढाणा, साहित्यिक क्षेत्रातील प्रभावी कथाकार डॉ.बबनराव महामुने, हिवरा आश्रम, बुलढाणा, सामाजिक कार्यास्तव आजन्म वाहून घेणारे नागसेन बौद्ध विहार, संस्था, चिखलीचे सचिव डॉ. डी. व्ही. खरात सर, माजी सभाती जि. प.बुलडाणा दिलीप जाधव तथा बुलढाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.विजय सावळे, ज्येष्ठ अभ्यासक डॉ.भगवान गरुडे, बुलढाणा तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गजानन वानखेडे, बुलढाणा यांच्या प्रमुख उपस्थितीमधे साजरा झालेल्या या अभिवादनासह अभिनंदन सोहळ्यात डॉ. वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या उपस्थित सर्व पुष्पअर्पण करण्यात आले.
यावेळी साहित्यिक, शाहीर, कवी, कलावंत, गायक, वादक, अभिनेते, दिग्दर्शक तथा कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. यावेळी 1960 पासून वामनदादांच्या शाहीरी चळवळीत सक्रिय सहभागी असलेले व सहा दशकांपेक्षा जास्त सामाजिक कार्यात सातत्याच्या चिरंतन वाटचालीमुळे अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, अॅडव्होकेट, चिखली यांनी जगप्रसिद्ध अब्राहम लिंकन यांच्या – द स्ट्रँगल होल्ड ऑफ न ऑप्रेसर कॅनाट बी लूझन बाय न अपील टू हीज कन्सायन्स, फॉर इट इज ए क्वेश्चन ऑफ सर्व्हायव्हल फॉर वन ंड लिबरेशन ऑफ अदर्स ! – या विधानानुसार अन्यायावर तुटून पडण्यासाठी युगे युगे सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला जागृत करण्यास्तव दादांनी आपल्या शाहीरीतून केलेल्या गर्जनेचा तसेच पाश्चात्य विद्वान जॉन ड्रेडनच्या – द बॅलन्सड् माईंड इज नेसेसरी टू बॅलन्स दि माईंडस् ऑफ अनबॅलन्सड् पर्सन्स ! – या उक्ती नुसार समाजाला पुढे नेण्यासाठी स्वत:ला स्वयंसिद्ध बनवण्यास्तव केलेल्या आवाहनाचा विशेष उल्लेख करून दादांनी आपल्या गीतांनी जनमनावर कोरलेला ठसा त्रिकालाबाधित राहील, असे विधान केले.
तसेच डॉ. गरूडे, डॉ. वानखेडे, डॉ. महामुने, डॉ. मंजूताई यांनीही वामनचे एक गीत माझ्या दहा भाषणाच्या बरोबर असल्याच्या बाबासाहेबांनी जाहीर सभेत बोललेल्या त्या वाक्यातंच दादांचं सारं मोठेपण सामावलेलं असल्याची आपापल्या भाष्यातून ग्वाही दिली.
यावेळी बुलढाणा जिल्ह्यात होऊ घातलेल्या झेप साहित्य संमेलन, 2023 चे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. वामनदादा कर्डक यांचे दिर्घकालीन ज्येष्ठ शिष्य या नात्याने डॉ.विजयकुमार कस्तुरे यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
भगवान बुध्दाचा धम्म मानवतेकडे Lord Buddha’s Dhamma to Humanity